AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup मधील टीम इंडियाच्या पराभवानंतर रडली अनुष्का; शाहरुखने दिला धीर

वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत याआधी धडकलेल्या सर्व भारतीय संघांच्या तुलनेत यंदाचा भारतीय संघ सरस होता. त्याचप्रमाणे यंदाच्या ऑस्ट्रेलियन संघांच्या तुलनेत विद्यमान संघ कमकुवत होता. तरीही अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर बाजू उलटवली. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाली.

World Cup मधील टीम इंडियाच्या पराभवानंतर रडली अनुष्का; शाहरुखने दिला धीर
Anushka Sharma and Shah Rukh KhanImage Credit source: Twitter
| Updated on: Nov 20, 2023 | 8:51 AM
Share

मुंबई : 20 नोव्हेंबर 2023 | कोट्यवधी लोकांच्या अपेक्षांच्या दडपणाखाली टीम इंडिया रविवारी वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पूर्णपणे निष्प्रभ ठरला. वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने सलग 10 दहा सामने जिंकले होते. मात्र अकराव्या अंतिम सामन्यात मुरब्बी ऑस्ट्रेलियाने मोक्याच्या क्षणी बाजू उलटवली. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं. या पराभवानंतर अनेकांचे डोळे पाणावले होते. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचली होती. टीम इंडियाच्या पराभवानंतर अनुष्कालाही अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ती भावूक झाल्याचं पहायला मिळत आहे. अशातच बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने ट्विट करत टीम इंडियाला धीर दिला.

काय म्हणाला शाहरुख?

‘टीम इंडिया संपूर्ण टूर्नामेंटमध्ये ज्याप्रकारे खेळली ती सन्मानाची बाब आहे. त्यांनी खूप उत्साह आणि चिकाटी दाखवली. हा एक खेळ आहे आणि त्यात एखाद-दुसरा वाईट दिवस असतोच. दुर्दैवाने ते आज घडलं. परंतु क्रिकेटमधील आपल्या खेळाचा वारसा ज्या पद्धतीने टीम इंडियाने पुढे नेला, ते पाहून मला त्यांचा फार अभिमान वाटतो. यासाठी मी टीम इंडियाचे आभार मानतो. तुम्ही संपूर्ण भारताला खूप आनंद दिला. प्रेम आणि आदर. तुम्ही आम्हाला एक अभिमानी राष्ट्र बनवलात’, अशा शब्दांत शाहरुखने टीम इंडियाचं कौतुक केलं.

शाहरुख त्याच्या कुटुंबीयांसोबत वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी, मॅनेजर पूजा ददलानी, मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान उपस्थित होते. याशिवाय बॉलिवूडमधील इतरही बरेच सेलिब्रिटी टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले होते. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, आयुषमान खुराना, शनाया कपूर यांसारखे सेलिब्रिटी स्टेडियमवर उपस्थित होते.

वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात एकाही बॅट्समनला म्हणावी अशी छाप पाडता आली नाही. रोहित शर्मा अर्धशतकाच्या समीप पोहोचून मोक्याच्या क्षणी बाद झाला. विक्रमवीर विराट कोहली अर्धशतक झळकावून लगेचच बाद झाला. तर के. एल. राहुलचं अर्धशतक सावकाश गतीमुळे संघासाठी कुचकामी ठरलं. शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे इतर फलंदाजसुद्धा अपयशी ठरले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.