Well Done Baby : ‘वेल डन बेबी’साठी पुष्कर-अमृता सज्ज; ‘या’ कारणांमुळे दोघांसाठीही सिनेमा खास

‘वेल डन बेबी’ हा मराठी चित्रपट लवकरच अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. (Pushkar Jog and Amruta Khanvilkar is ready for 'Well Done Baby' )

Well Done Baby : ‘वेल डन बेबी’साठी पुष्कर-अमृता सज्ज; 'या' कारणांमुळे दोघांसाठीही सिनेमा खास
वेल डन बेबी

मुंबई : ‘वेल डन बेबी’ (Well Done Baby) हा मराठी चित्रपट लवकरच अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते यांच्यासोबत एका हलक्या फुलक्या कौटुंबिक नाट्य असलेल्या या मराठी चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा एकदा लक्षात राहण्याजोगा परफॉर्मन्स देण्यास सज्ज झाली आहे. सोबतच अभिनेता पुष्कर जोगनं सुद्धा या चित्रपटात धमाकेदार काम केलं आहे. मीराच्या भूमिकेत, अमृताने एका अशा स्त्रीची भूमिका साकारली आहे, जी वैवाहिक अडचणींना सामोरे जात असतानाच, अनपेक्षित गर्भधारणा आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये होणार्‍या एकूणच बदलांशी संबंधित आहे. (Pushkar Jog and Amruta Khanvilkar is ready for ‘Well Done Baby’ )

अमृतानं व्यक्त केल्या भावना

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या अनुभवाविषयी बोलताना अमृता म्हणाली, “वेल डन बेबी ही एक अतिशय खास कथा आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या अशा भिंगातून ती नातेसंबंधांवर भाष्य करते. या चित्रपटामुळे मला हे समजायला मदत झाली की आपण घेतलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयाचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो आणि त्याच वेळी आपले संबंध कसे विकसित होत जातात, हे देखील मला समजले. चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा जवळपास माझ्यासारखीच आहे. मी तिच्याशी खूप चांगल्या तऱ्हेने समरूप होऊ शकते, तिला समजून घेऊ शकते आणि त्यामुळे चित्रपटातील मीरा मी अधिक चांगल्या प्रकारे साकारू शकले.”

प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘वेल डन बेबी’

प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘वेल डन बेबी’ची कहाणी आधुनिक काळातील अशा जोडप्याभोवती फिरते, जे त्यांच्या वैवाहिक समस्यांसोबत झगडत असताना त्यांना लक्षात येते की त्यांना मूल होणार आहे. या चित्रपटाचा खास प्रीमिअर भारतात अमेझॉन प्राईम व्हिडिओवर 9 एप्रिल रोजी होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

पुष्करसाठी हा चित्रपट आहे अतिशय खास…

तर अभिनेता पुष्कर जोगसाठी हा चित्रपट खूप खास आहे. या विषयी बोलताना,  म्हणाला, “वेल डन बेबीच्या कथेला माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. मी यातील व्यक्तिरेखेला अगदी स्वाभाविकपणे सादर करू शकतो, मी त्याच्यासोबत स्वत:ला पूर्णपणे जोडून घेऊ शकतो, कारण मी हल्लीच बाबा झालो आहे. माझा स्वत:चा वैयक्तिक अनुभव डोळे उघडणारा होता ज्यामुळे मी या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि आदित्यची व्यक्तिरेखा यांचा संबंध अनुभवू शकतो. संपूर्ण प्रवास, एका जोडप्यामधील जटीलतेपासून, तो क्षण त्यांच्या आई बाबा बनण्यापर्यंतचा, खऱ्या अर्थाने जवळ येण्याचा आहे; गर्भावस्थेची प्रत्येक पायरी आपल्या आपल्यामध्येच एक आनंददायक एडवेंचर आहे. मला विश्वास आहे कि प्रेक्षक देखील या अंतहीन कथेला तितकेच खास समझून घेतील जितकी ती माझ्यासाठी आहे.”

संबंधित बातम्या

Photo : ‘हॅप्पी बर्थ डे…’ वाद विवाद आणि स्वरा भास्कर, जाणून घ्या काही खास गोष्टी

Photo : लाडक्या शनायाची समर स्टाईल, अभिनेत्री रसिका सुनिलचं नवं फोटोशूट