रणबीर कपूरसोबत ब्रेकअपवर हे काय बोलून गेली दीपिका पादुकोण
अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. दोघेही त्यांच्या येणाऱ्या बेबीची वाट पाहत आहेत. रणवीर सिंगच्या आधी दीपिका रणबीर कपूरला डेट करत होते. पण काही कारणास्तव दोघांचा ब्रेकअप झाला. दीपिकाने या ब्रेकअप प्रतिक्रिया दिली होती. काय म्हणाली होती ती जाणून घ्या.

दीपिका पदुकोण ही लवकरच आई होणार आहे. तिने अभिनेता रणवीर सिंगसोबत 14 नोव्हेंबर 2018 रोजी विवाह केला होता. दक्षिण भारतीय तसेच सिंधी पद्धतीने दोघांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाला आता जवळपास 7 वर्षे झाली आहेत. लग्नाच्या 7 वर्षानंतर दीपिका पदुकोण आई होणार आहे. पण सध्या ती तिच्या एका जुन्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कॉफी विथ करणमध्ये तिने हे वक्तव्य केले होते आणि तिने रणबीर कपूरबद्दल असे काही बोलले होते ज्यामुळे ती आजही चर्चेत आहे.
एक काळ असा होता जेव्हा दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करत होते. 2007 मध्ये ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटादरम्यान त्यांच्यात जवळीकता वाढली होती. दीपिकाने रणबीरच्या नावाचा टॅटूही बनवला होता. दोघेही नात्याबाबत गंभीर होते. दोघांना लग्न ही करायचे होते. पण नंतर 2 वर्षातच दोघांचे ब्रेकअप झाले. नंतर रणबीर हा कतरिना कैफ सोबत रिलेशनशिपमध्ये होता अशीची चर्चा होती.
रिपोर्ट्सनुसार, अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटादरम्यान रणबीर कपूर आणि कतरिना कैफ जवळ आले. यामुळे दीपिका आणि रणबीर यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. रणबीरकडून फसवणूक झाल्याची भावना दीपिकाची होती. ज्यामुळे तिला धक्का बसला होता आणि त्यातून बाहेर यायला तिला बराच वेळ लागला.
दीपिका पदुकोण कॉफी विथ करणमध्ये पोहोचली तेव्हा तिने रणबीरसोबतच्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला होता. तिला विचारण्यात आले की तिचे रणबीरसोबतचे ब्रेकअप अवघड होते का? ज्यावर ती म्हणाला की हे माझ्यासाठी खूप कठीण होते. कारण ते नाते माझ्यासाठी जग बनले होते.
दीपिका पदुकोण पुढे म्हणाली की, मी या शहरात नवीन होते आणि त्याचे मित्रही माझे मित्र बनले होते. त्याचे जीवन माझे जीवन बनले आणि मी माझे स्वतःचे जीवन जगण्याचा प्रयत्न केला असे मला वाटत नाही. जेव्हा हे नाते संपले तेव्हा त्याने मला खूप काही शिकवले आणि आज मला एक चांगला माणूस बनवले.
रणबीर कपूरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूरने यांनी देखील या नात्यावर भाष्य केले होते. सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये त्यांनी म्हटले होते की, रणबीर कपूरला खूप गर्लफ्रेंड आहेत असं मला वाटत नाही. त्याची एकच मैत्रीण होती आणि ती म्हणजे दीपिका. त्यांच्या नात्यात काहीतरी कमी होतं. प्रत्येकाचे नाते असते आणि ते पुढे जातात.
