Dhanush: बॉडी शेमिंगमुळे धनुषला कोसळलं होतं रडू; सेटवरील लोकांनी म्हटलं होतं ‘ऑटोरिक्षावाला’

धनुषने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण एक वेळ अशी होती की त्याला बॉडी शेमिंगचा (Body Shaming) सामना करावा लागला होता. तेसुद्धा त्याच्याच चित्रपटाच्या (Kaadhal Kondein) सेटवर.

Dhanush: बॉडी शेमिंगमुळे धनुषला कोसळलं होतं रडू; सेटवरील लोकांनी म्हटलं होतं 'ऑटोरिक्षावाला'
धनुषने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण एक वेळ अशी होती की त्याला बॉडी शेमिंगचा (Body Shaming) सामना करावा लागला होता. Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 2:33 PM

अभिनेता धनुष (Dhanush) केवळ साऊथ फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर संपूर्ण देशात लोकप्रिय आहे. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केलं आहे. धनुषने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण एक वेळ अशी होती की त्याला बॉडी शेमिंगचा (Body Shaming) सामना करावा लागला होता. तेसुद्धा त्याच्याच चित्रपटाच्या (Kaadhal Kondein) सेटवर. धनुषची देहयष्टी पाहून त्याला ‘ऑटोरिक्षावाला’ असं म्हणायचे. त्याला हे सर्व सहन झालं नाही आणि तो ढसाढसा रडला होता. 2015 मध्ये ही घटना घडली होती.

2015 मध्ये ‘कढल कोंडेन’च्या सेटवर विजय सेतुपती, अनिरुद्ध रविचंदर आणि सतीश यांना बॉडी शेमिंग केल्याच्या घटनेबद्दल सांगताना धनुष म्हणाला, “कढल कोंडेनच्या शूटिंगदरम्यान मला नायक कोण आहे हे विचारण्यात आलं होतं. मी कलाकारांमधील दुसर्‍या कोणाकडे तरी सूचित केलं, कारण मी आणखी अपमान सहन करण्यास तयार नव्हतो. मात्र, नंतर जेव्हा त्यांना कळलं की मीच हिरो आहे, तेव्हा सेटवरील सर्वजण माझ्यावर हसले. ते म्हणाले हा ऑटोचालक बघा, तो हिरो आहे. वगैरे वगैरे. मी माझ्या कारजवळ गेलो आणि जोरात रडू लागलो. कारण तेव्हा मी वयाने खूपच लहान होतो आणि माझ्यात खरंच तेवढा अपमान सहन करण्याची ताकद नव्हती. असा एकही माणूस नाही ज्याने मला ट्रोल केलं नाही किंवा बॉडी शेमिंग केलं नाही.”

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

मात्र या ट्रोलिंगमुळे न खचता धनुषने तेव्हापासून आतापर्यंत अभिनयविश्वात बराच पल्ला गाठला आहे. धनुषला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. केवळ नायक म्हणून नाही तर अष्टपैलू कलाकार म्हणूनही त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. धनुषचं पूर्ण नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. तो निर्माता, दिग्दर्शक आणि पार्श्वगायकदेखील आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 46 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि अनेक पुरस्कारसुद्धा जिंकले आहेत.

38 वर्षीय धनुष त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत 2004 मध्ये त्याने लग्न केलं. या दोघांना दोन मुलंही आहेत. पण या वर्षी जानेवारीमध्ये दोघांनी विभक्त झाल्याची घोषणा केली. रजनीकांत यांनी दोघांनाही समजवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र दोघंही घटस्फोट घेण्यावर ठाम होते.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.