AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिथे दाम तिथे काम…प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर जेव्हा बनला सेल्समन !

बॉलिवूडमध्ये नामवंत गायक शान याची लोकप्रियता अफाट आहे. त्याच्या गाण्याचे अन् आवाजाचे लाखो चाहते आहेत. गेल्या 2 दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या शानने त्याच्या कारकिर्दीत अनेक गाणी गायली आहेत. शान नेहमीच संगीताशी संलग्न होता पण पण बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला.

जिथे दाम तिथे काम...प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर जेव्हा बनला सेल्समन !
| Updated on: Mar 14, 2024 | 2:27 PM
Share

Shaan Talks About Career Struggle : बॉलिवूडमध्ये नामवंत गायक शान याची लोकप्रियता अफाट आहे. त्याच्या गाण्याचे अन् आवाजाचे लाखो चाहते आहेत. गेल्या 2 दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या शानने त्याच्या कारकिर्दीत अनेक गाणी गायली आहेत. शान नेहमीच संगीताशी संलग्न होता पण पण बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, शानने त्याच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितलं. पैसे कमावण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी त्याने काय-काय कामं केली तेही सांगितल.

जिथे दाम तिथे काम

शान म्हणाला, हो, मी एका बुटीकमध्ये काम केले आहे. याशिवाय मी माझ्या एका मित्रासोबत सेल्स बॉय म्हणूनही काम केले. मी शिकवणी देखील घेतली. केबल पॉइंट विकले. याशिवाय मी कॉम्प्युटरवर पुस्तक लिहिण्याचे कामही सुरू केले होते, पण ते कसं करायचं याची मला कल्पनाच नव्हती. मी तेव्हा गाणीही गायचो, पण ती कमाई पुरेशी नव्हती. त्यामुळे मी इकडे-तिकडे हातपाय मारत, वेगवेगळी कामं केली. जिथे दाम तिथे काम, अशी तेव्हा जीवनात वृत्ती होती, असं शान म्हणाला.

पुढे शान म्हणाला, तेव्हा मी काहीही केलं असतं पण टिकून राहणं खूप कठीण होतं. तेव्हा मी जिंगल्स गायचो. मला लहानपणापासूनच जिंगल्स गायची सवय आणि अनुभव होता. त्यामुळे जिंगल्स गाऊन मला 200-300 रुपये मिळायचे. अशीच जिंगल्स गाता-गाता मला चित्रपटात गाणी म्हणण्याची संधी मिळाली. मी सीरियसल गात होतो, पण गाण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल नाही, असंही त्याने सांगितलं. चांद सिफारिश, जबसे तेरे नैना, बहती हवासा था वो, दीवानगी, मे हू डॉन , चैन आपको मिला अशी अनेक प्रसिद्ध गाणी शानने गायली आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.