Pushpa 2 च्या आयटम सॉन्गसाठी समंथाला कोण करणार रिप्लेस? ‘या’ 2 अभिनेत्रींच्या नावाची चर्चा…
Pushpa 2 Item Song: 'पुष्पा 2' सिनेमाची उत्सुकता शिगेला... आयटम सॉन्गसाठी समंथाला कोण करणार रिप्लेस? 'या' दोन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा..., अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा' सिनेमाने फक्त भारतात नाही तर, संपुर्ण जगभरात विक्रम रचले...

Pushpa 2 Item Song: अभिनेता अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा’ सिनेमाने फक्त भारतात नाही तर, संपुर्ण जगभरात विक्रम रचले. सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर उचलून घेतलं. सिनेमातील गाणी देखील जबरदस्त हीट झाली. गाण्यांवर अनेकांना रील देखील तयार केल्या आणि सोशल मीडियावर पोस्ट केल्या. सिनेता एक गाणं अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. गाणं हीट झालं आणि समंथाच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. ‘ऊ अंटवा’ असं समंथा हिच्यावर चित्रित करण्यात आलेल्या गाण्याचं नाव होतं.
सांगायचं झालं तर, ‘पुष्मा’ सिनेमाच्या पहिल्या भागाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. आता सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चर्चा रंगली आहे. चाहते देखील ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. पण यंदा सिनेमा समंथा दिसणार नाही. अशात सिनेमातील आयटम सॉन्गसाठी समंथाला कोणती अभिनेत्री रिप्लेस करणार अशी चर्चा रंगली आहे. खुद्द समंथाने ऑफर नाकारली आहे. अशात समंथा हिच्या जागी दोन प्रसिद्ध अभिनेत्रींच्या नावाची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ‘पुष्पा 2’ सिनेमात आयटम सॉन्ग करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. जान्हवी हिच्यासोबतच दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला हिच्या नावाची देखील चर्चा रंगली आहे. पण यावर अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सध्या ‘पुष्पा 2’ सिनेमाबद्दल अनेक चर्चा रंगत आहे. स्क्रिप्ट छोटी करायची असल्यास आयटम सॉन्ग हटवण्यात येऊ शकतं… अशी देखील चर्चा रंगत आहे. त्यामुळे ‘पुष्पा 2’ सिनेमात काय वेगळेपण असेल हे पाण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. चाहत्यांच्या मनात सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘पुष्पा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, जगभरात सिनेमाने तगडी कमाई केली होती. सिनेमाने 350 कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमात अभिनेता अल्लू अर्जुन, रश्मिका मंदना आणि अन्य कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती. ‘पुष्पा 2’ सिनेमा 6 डिसेंबर 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली.
