Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : ‘ घे आईची शप्पथ..’, त्या निर्णयावरून युजवेंद चहलचा धनश्रीला टोमणा ? चर्चांना उधाण
क्रिकेटर युजवेंद्र चहल त्याच्या खेळामुळे नव्हे तर पर्सनल लाईफ,विवाद यांच्यामुळेच जास्त चर्चेत असतो. सध्या त्याची इन्स्टा पोस्टही चर्चेच्या अग्रस्थानी आहे. त्याने या पोस्टमधूनन कथितरित्या त्याच्या पूर्व पत्नीला, धनश्रीला टोमणा मारल्याचे बोलले जात आहे. मात्र काही वेळाने त्याने ही पोस्ट डिलीट करून टाकली आहे. त्यावरून चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

आयुष्यात कशीही परिस्थिती आली तरी पुढे चालत राहिलं पाहिजे, मूव्ह ऑन केलं पाहिजे असं म्हणतात. पण काही लोकांसाठी मूव्ह ऑन करणं तितकं सोपं असतं का असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ शकतं. क्रिकेटर युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) पोस्ट्स,टिप्पण्या पाहून तरी असंच म्हणावं लागेल. कारण हा भारतीय क्रिकेटर त्याच्या बॉलिंगपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. सोशल मीडियावरील त्याच्या पोस्ट्सचीही चर्चा होत असते. त्यान् इन्स्टाग्रामवर नुकत्याच शेअर केलेल्या एका स्टोरीने तर वादळचं आणलं, त्या पोस्टमधून याने त्याची पूर्व पत्नी, धनश्री वर्मा (Dhanshree Verma) हिला खणखणीत टोला लगावल्याच्या चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाल्या. काही वेळापूर्वी युजवेंद्र चहलने दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. ‘आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र पत्नी त्यांच्या पतींकडून पोटगी मागू शकत नाहीत.’ असं त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं.
युजवेंद्रचा टोला
हा स्क्रीनशॉट आपल्या अकाऊंटवर शेअर करताना युजवेंद्रने एक कॅप्शन लिहीली, ती म्हणजे ‘घ्या आईची शपथ, की या निर्णयावरून पलटी मारणार नाही’,असं त्याने लिहीलं. मात्र अवघ्या काही वेळानंतरच त्याने ही पोस्ट डिलीट केली, पण तेवढ्या वेळातच ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे ऑनलाइन जोरदार वादविवाद सुरू झाला, ही पोस्ट धनश्री वर्मावर साधलेला निशाणा होता की कायदेशीर निर्णयाचे समर्थन ? असा सवाल अनेक जण विचारू लागले.
इथे पहा पोस्ट
View this post on Instagram
हाय-प्रोफाईल विभक्तीनंतर अनेक महिन्यांनी केली पोस्ट
युजवेंद्र चहल आणि त्याची कोरिओग्राफर आणि प्रभावशाली पूर्व पत्नी धनश्री वर्मा हे काही काळापूर्वी एकमेकांपासून विभक्त झाले. खरंतर डिसेंबर 2020 मध्ये त्याचं लग्न झालं, मात्र नंतर त्यांच्यात खटके उडू लागले. आणि मार्च 2025 मध्ये मुंबई हायकोर्टातील सुनावणीनंतर ते दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले. यावेळी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की घटस्फोटानंतर धनश्रीला कोटी रुपयांची पोटगी मिळाली. पण चहल किंवा धनश्री या दोघांपैकी कोणीच यावर अधिकृतपणे भाष्य केलं नाही ना पोटगीची रक्कम उघड केली.
यूजर्सच्या प्रतिक्रिया
आता त्याच्या घटस्फोटोला अनेक महिने झाले असून चहलने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमुळे ते दोघे पुन्हा चर्चेत आलेत. चहलची ही पोस्ट कहाणी आणि अलीकडील कायदेशीर निर्णय यांच्यातील संबंध शोधून काढला, ज्यामुळे त्यांच्या हाय-प्रोफाइल ब्रेकअपबद्दल पुन्हा ऑनलाइन चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मीम्स आणि कमेंट्सना पूर आला. अनेकांना चहलची कमेंट म्हणजे त्यांचा चांगला ह्यूमर वाटला,काहींनी त्याचं कौतुक केले. पण काही लोकांनी त्याला सल्ला दिला. हे (घटस्फोटाचं) प्रकरण मागे सोडून तु आता पुढे जा, मूव्ह ऑन कर असा सल्ला लोकांनी दिला.
