Sonakshi Sinha ने इस्लाम स्वीकारण्याबद्दल झहीर इक्बालचं लक्षवेधी वक्तव्य, सर्वत्र चर्चांना उधाण
Sonakshi and Zaheer Iqbal: सोनाक्षी हिचे धर्मांतर करण्यासाठी मशीदीत..., बायकोने इस्लाम स्वीकारण्याबद्दल झहीर इक्बाल असं काय म्हणाला? सर्वत्र चर्चांना उधाण

Sonakshi and Zaheer Iqbal: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी लग्न केलं तेव्हा फार मोठा मुद्दा झालेला. सोनाक्षी हिने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मुस्लीम मुलासोबत लग्न केलं. दोघांनीही हिंदू किंवा मुस्लिम पद्धतीने लग्न केलं नाही तर कोर्ट मॅरेज केलं, त्यानंतर लोकांनी त्याला लव्ह जिहाद असं म्हटलं. इक्बाल याच्यासोबत लग्न केल्यानंतर सोनाक्षी इस्लाम धर्म स्वीकारेल अशी देखील चर्चा रंगू लागली… आता सोनाक्षी हिच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं असून अभिनेत्री धर्मांतरण फार मोठा मुद्दा झाला आहे. आता देखील धर्मावरुन सोनाक्षी आणि इक्बाल चर्चेत आले आहेत.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल नुकताच एका प्रमोशनल ट्रिपसाठी अबुधाबीला गेले होते. दोघांनी त्यांच्या ट्रिपचा एक व्हिडिओ ब्लॉग यूट्यूबवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सोनाक्षी मशिदीला भेट देण्यास खूप उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. या उत्साहाबद्दल झहीरने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
सोनाक्षी म्हणते, ‘अबू धाबी टुरिझमने आम्हाला शहराचं सौंदर्य पाहण्यासाठी आमंत्रित केलं त्यांनी आमच्यासाठी एक अद्भुत प्रवास कार्यक्रम देखील तयार केला. आमचा पहिला स्टॉप शेख जायद ग्रँड मशिद असणार आहे… आणि यासाठी मी उत्साहित आहे… मी पहिल्यांदा मशिदीत जाणार आहे. मी मंदिर, चर्चमध्ये गेली आहे… पण कधीच मशिदीत गेली नाही…’
यावर इक्बाल म्हणाला, ‘स्पष्ट सांगत आहे … सोनाक्षी हिला इस्लाम धर्माचा स्वीकार करण्यासाठी घेऊन जात नाही… जे प्रचंड खरोखर सुंदर आहे तेच पाहण्यासाठी आम्ही जात आहोत…’, इक्बाल याच्या वक्तव्यावर सोनाक्षी म्हणाली, ‘स्पेशल मॅरेज अॅक्ट झिंदाबाद…’
सोनाक्षी आणि झहिर याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘झहीर खान ज्या पद्धतीने ट्रोलर्सना विनोदी उत्तरे देतो ते मला खूप आवडतं. झहीर, खऱ्या सोन्याला त्याचं खरं सोनं सापडलं आहे.’, दुसऱ्याने लिहिले, “मला सोनाक्षीचा नवरा खूप आवडतो. तो खूप मजेदार आहे. त्याची बुद्धिमत्ता अद्भुत आहे.” तिसऱ्याने लिहिलं, ‘ते सर्वात सुंदर कपल आहे.’