AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा मूड सुधारण्यासाठी ‘या’ 6 पदार्थांचे करा सेवन, मानसिक ताणही होईल दूर

आजच्या धकाधकीच्या जीवनात मूड खराब होणे, ताणतणाव चिंता यासारख्या समस्या सामान्य होत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की काही पदार्थांचे सेवन केल्याने तुमचा मूड सुधारण्यास मदत होते. चला तर मग आजच्या या लेखात आपण मुड चांगला करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करू शकतात त्याबद्दल जाणून घेऊयात...

तुमचा मूड सुधारण्यासाठी 'या' 6 पदार्थांचे करा सेवन, मानसिक ताणही होईल दूर
lift your mood
| Edited By: | Updated on: Jul 31, 2025 | 10:44 PM
Share

आजच्या धावपळीच्या जीवनात आणि तणावपूर्ण वातावरणात आपला मूड अनेकदा खराब होतो. कधीकधी कामाचा ताण तर कधीकधी वैयक्तिक आयुष्यातील समस्या आपल्याला तणावात ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का की काही असे अन्नपदार्थ आहेत जे आपल्या मूडवर परिणाम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

हो, असे काही आरोग्यदायी पदार्थ आहेत जे सेरोटोनिन, डोपामाइन आणि एंडोर्फिन सारखे आनंदी हार्मोन्स वाढवतात, ज्यामुळे आपला मूड चांगला राहतो. चला अशा 6 आरोग्यदायी पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे तुमचा मूड सुधारू शकतात.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटची चव तर छान असतेच, पण ते मूड बूस्टर म्हणूनही काम करते. त्यात कोकोचे प्रमाण जास्त असते, जे एंडोर्फिन आणि सेरोटोनिनची पातळी वाढवते. डार्क चॉकलेटमध्ये असलेले मॅग्नेशियम ताण कमी करण्यास मदत करते. मात्र मर्यादित प्रमाणात डार्क चॉकलेट खावे, कारण जास्त साखर आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

केळी

केळी हे एक सुपरफूड आहे जे पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि नैसर्गिक साखरेने समृद्ध आहे. व्हिटॅमिन बी 6 सेरोटोनिन हार्मोनच्या निर्मितीस मदत करते, ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. याशिवाय केळीमध्ये ट्रिप्टोफॅन अमीनो ॲसिड असते, जे आनंदी हार्मोन्सना प्रोत्साहन देते.

नट्स आणि बिया

बदाम, अक्रोड, काजू आणि भोपळ्याच्या बिया यांसारख्या नट्स आणि बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. हे सर्व पोषक तत्व मेंदूला निरोगी ठेवण्यास आणि ताण कमी करण्यास मदत करतात. अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड नैराश्य कमी करण्यास मदत करतात.

हळदीचे दूध

हळदीमध्ये कर्क्यूमिन घटक असते, जे एक सक्रिय संयुग असते. ते एक पॉवरफुल दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट आहे. हळदीचे दूध प्यायल्याने डोपामाइन आणि सेरोटोनिनची पातळी वाढते, ज्यामुळे मूड सुधारतो. झोप देखील सुधारते, तसेच ताणही कमी होतो.

पालक आणि हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये फोलेट व्हिटॅमिन बी 9 भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूसाठी फायदेशीर असते. फोलेटच्या कमतरतेमुळे नैराश्य आणि चिडचिडेपणा येऊ शकतो. पालक, मेथी, ब्रोकोली यासारख्या भाज्या खाल्ल्याने मूड स्विंग कमी होतात आणि मानसिक आरोग्य सुधारते.

दही आणि प्रोबायोटिक पदार्थ

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यांसाठी फायदेशीर बॅक्टेरिया असतात. अनेक अभ्यासातून असेही दिसून आले आहे की आतडे आणि मेंदू यांच्यात थेट संबंध असतो . निरोगी आतडे मूड चांगला ठेवतात आणि तणाव कमी करतात. दह्याव्यतिरिक्त, इडली, डोसा, किमची आणि दही सारखे प्रोबायोटिक पदार्थ देखील मूड बूस्टर म्हणून काम करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट