AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या घरात आनंदात गरबा खेळला, नाचला, नंतर जे घडलं, त्याने सगळ्यांनाच बसला धक्का

जे घडलं, त्यावर अजूनही कोणाला विश्वास बसत नाहीय. असं काही घडेल याची कोणीही कल्पना केली नव्हती. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात काहीच खर नाहीय, हे पुन्हा एकदा दिसून आलं.

लग्नाच्या घरात आनंदात गरबा खेळला, नाचला, नंतर जे घडलं, त्याने सगळ्यांनाच बसला धक्का
Amit chauhan
| Updated on: May 05, 2023 | 3:02 PM
Share

राजकोट : सध्या धकाधकीच्या आयुष्यात काहीच खर नाहीय. कधी, काय घडेल, सांगता येत नाही. एखाद्या आनंदाच्या, मंगल क्षणी दु:खद घटना घडून जाते, ज्याचा कोणी विचार केलेला नसतो. अशीच एक दुर्देवी घटना राजकोटमध्ये घडली. सध्या अचानक कार्डिअक अरेस्टमुळे मृत्यू होण्याच प्रमाण जास्त आहे. यात युवकांची संख्या लक्षणीय आहे. आता वयाच्या तिशी-पसंतीशी ह्दयविकारामुळे मृत्यू होत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारे आकडे भयावह आहेत.

राजकोटमध्ये एका 36 वर्षीय व्यक्तीचा गरबा खेळल्यानंतर अचानक मृत्यू झाला. अमित चौहान असं मृत व्यक्तीच नाव आहे. कौटुंबिक लग्न सोहळ्यात गरबा खेळून आल्यानंतर अमितचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

अस्वस्थ असल्याच कुठलही लक्षण नव्हतं

“कौटुंबिक लग्न सोहळ्यात आम्ही सर्व दांडीया आणि गरबा खेळत होतो. अमित चांगला वाटत होता. तो अस्वस्थ असल्याच कुठलही लक्षण दिसत नव्हतं. घरी आल्यानमंतर त्याने छातीत दु:खत असल्याची तक्रार केली. त्याला आम्ही रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर अमितला मृत घोषित केले” असं अमितचा चुलतभाऊ लखमन चौहानने सांगितलं.

अचानक हार्ट अटॅकच प्रमाण का वाढलं?

अमित चौहानचा सोन्याचा व्यवसाय होता. मालवीय नगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. “दरदिवशी आमच्याकडे कार्डिअक अरेस्टची 8 ते 10 प्रकरण येतात. बहुतांश रुग्णांच वय 45 पेक्षा कमी असतं. तणाव, चुकीची जीवनशैली त्याशिवाय कोविड 19 मुळे झालेलं नुकसान यामुळे युवकांना कार्डिअक अरेस्टचा धोका वाढलाय” असं राजकोट सिव्हील हॉस्पिटलचे डॉ. राधेश्याम त्रिवेदी म्हणाले. जवळपास 10 जणांचा अचानक मृत्यू

महिन्याभरापूर्वी 31 वर्षीय ग्राम सेवकाचा क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान मोरबी येथे मृत्यू झाला होता. क्रिकेट खेळत असताना ह्दयविकाराच्या झटक्यामुळे अचानक हा युवक जागीच कोसळला. जवळपास 10 जणांचा अचानक ह्दय विकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला आहे. काहीजण खेळत होते, काही अन्य शारीरिक कामात व्यस्त होते.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.