AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कयामत से..मधून आमिरला स्टार बनवणारा दिग्दर्शक, आता बायकोमुलांसह रहातोय दक्षिणेच्या जंगलात…

'कयामत से कयामत तक' आणि 'जो जीता वही सिकंदर' सारख्या हिट चित्रपटाचे सर्जक मंसूर खान हे गेल्या २५ वर्षांपासून चित्रपट क्षेत्रापासून दूर आहेत. आता ते तामिळनाडूच्या जंगलात आपल्या फार्महाऊसवर कुटुंबासह राहात आहेत.

'कयामत से..मधून आमिरला स्टार बनवणारा दिग्दर्शक, आता बायकोमुलांसह रहातोय दक्षिणेच्या जंगलात...
Mansoor Khan and Teena Khan
| Updated on: Jun 01, 2026 | 10:58 PM
Share

बॉलीवूडला ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘अकेले हम अकेले तुम’ आणि ‘जोश’ सारखे अविस्मरणीय चित्रपट देणारे दिग्दर्शक मन्सूर खान गेल्या २५ वर्षांपासून चित्रपट दिग्दर्शनापासून दूर आहेत. त्यांनी खूप कमी चित्रपट बनवले आहेत. परंतू हिंदी चित्रपटावर त्यांची अमिट छाप आजही कायम आहे. त्यांनी मुंबई सोडून दक्षिणेतील तामिळनाडूच्या कुनूर येथे आपले आगळे – वेगळे जीवन सुरु केले आहे.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नासिर हुसैन यांचा मुलगा मन्सूर खान याने साल १९८८ मध्ये ‘कयामत से कयामत तक’पासून दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केला होता. या चित्रपटात त्यांचा चुलत भाऊ आमिर खान आणि जुही चावला यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपट हीट झाला आहे मन्सूर खान रातोरात प्रसिद्ध झाले.

मन्सूर खान यांनी त्यानंतर आमिर सोबतच ‘जो जीता वही सिकंदर’ (1992) आणि ‘अकेले हम अकेले तुम’ (1995) हे चित्रपट बनवले. नंतर साल 2000 मध्ये शाहरुख खान आणि ऐश्वर्या सोबत ‘जोश’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. ‘जोशला फारसे यश मिळाले नाही आणि हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

मुंबईपासून दूर साऊथमध्ये फार्म हाऊस

मन्सूर खान यांची जवळपास सर्वच चित्रपट चालले आणि प्रेक्षकांमध्ये त्यांना आजही पसंद केले जात असताना मन्सूर खान यांनी चित्रपट जगतातून एक प्रकारे संन्यासच घेतलेला आहे.मन्सूर खान अलिकडे तामिळनाडूतील सुंदर हिल स्टेशन कून्नूर येथील त्यांच्या आलिशान फार्महाऊसमध्ये रहातात.

व्हरायटीशी अलिकडे बोलताना दिग्दर्शक मन्सूर खान यांनी सांगितले की त्यांना नेहमीच एक स्वतंत्र आणि निश्चिंत जीवन जगायचे होते.ते म्हणाले की मला नेहमीच एक कोणतेही टेन्शन नसलेला फिरस्ता म्हणून जगायचे होते. त्यामुळे कदाचित माझ्या चित्रपटाचे हिरो देखील तसेच असायचे.

त्यांनी सांगितले की मुंबई सोडण्याचा विचार त्यांचा मनात तेव्हा पासून होता, जेव्हा ते अमेरिकेतील मॅसाचुसेट्स इंन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT)मध्ये शिकत होते. मंसूर म्हणाले की १९९१ मध्ये आम्ही महाराष्ट्रातील मांडवा येथे जमीन खरेदी केली होती. कारण मी आधीच ठरवले होते की एक दिवस फिल्म क्षेत्र सोडायचे. मला तेथे राहाणे पसंद होते. परंतू १९९७ मध्ये सरकारने त्या जमीनीला तेथे तयार होणाऱ्या विमानतळासाठी अधिग्रहित केले होते. त्यानंतर मांडवा येथे राहाण्याचा प्लान रद्द झाला आणि साल २००३ मी कून्नूर येथे आलो.

प्राण्यासोबत शांततेचे जीवन

मंसूर खान यांनी आपल्या फार्महाऊस संदर्भातील काही रंजक गोष्टीही सांगितल्या. त्यांनी सांगितले की येथे अनेक जनावरे येत जात असतात. ते म्हणाले की येथे अनेक प्रकारचे प्राणी राहातात. हत्ती आणि बिबटे नेहमची आमच्या भागात दिसतात. याशिवाय बदक, कोंबड्या आणि हंस देखील असतात. सर्व एकमेकांशी शांततापूर्ण रहातात. हत्ती मैदानी प्रदेशात जातात आणि पुन्हा परत येतात.

बिबट्या संदर्भात माहिती देताना ते म्हणाले की वास्तविक बिबटा खूपच लाजाळू प्राणी असतो. अनेक प्रकरणात हत्ती त्याच्याहून जास्त धोकादायक असतात. आमच्या अनेक पाहूण्यांनी अनेकदा रात्री बिबट्यांना पाण्याच्या भांड्यातून पाणी पिताना पाहिलेले आहे.

पत्नीलाही कून्नूर खास आवडते

मंसूर यांनी सांगितले की त्यांची पत्नी टीना खान हीला देखील कून्नूर जास्त आवडते. त्यांनी सांगितले की एका क्षणी आर्थिक अडचणी आल्यानंतरही त्यांची पत्नी पुन्हा मुंबईत जायला तयार झाली नाही.मंसूर आणि टीना यांना दोन मुले आहेत. त्यांची मुलगी झॅन मॅरी खान देखील अभिनय क्षेत्राशी जुडलेली आहे. वर्क फ्रंट संदर्भात बोलायचे झाले तर मंसूर खान यांनी अलिकडेच आमिर खान सोबत मिळून साई पल्लवी आणि जुनैद खान यांचा चित्रपट ‘एक दिन’ ची निर्मिती केली होती. मात्र, हा रोमँटिक ड्रामा बॉक्स ऑफीसवर खास कमाल दाखवू शकला नाही.

Follow Us
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
मोठी बातमी! पंजाब, UP सह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या...
मोठी बातमी! पंजाब, उत्तर प्रदेशसह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे नवे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या तयारीत
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले...
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही