Corona Vaccine: कोरोनाच्या नव्या विषाणूंना मात देण्यासाठी बूस्टर डोसची गरज : AIIMS संचालक डॉ रणदीप गुलेरिया

देशात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन आरोग्य विभाग रणनीती तयार करत आहे. अशातच एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr Randeep Guleria) यांनी कोरोना लसीकरणाबाबत आणि कोरोनाच्या नव्या विषाणूंबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय.

Corona Vaccine: कोरोनाच्या नव्या विषाणूंना मात देण्यासाठी बूस्टर डोसची गरज : AIIMS संचालक डॉ रणदीप गुलेरिया
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 5:32 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन आरोग्य विभाग रणनीती तयार करत आहे. अशातच एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr Randeep Guleria) यांनी कोरोना लसीकरणाबाबत आणि कोरोनाच्या नव्या विषाणूंबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या नव्या विषाणूंवर मात करण्यासाठी बूस्टर डोसची गरज पडेल, असं मत डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “भविष्यात कोरोनाच्या विषाणूचे आणखी व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला कोविड लसीकरणासोबतच बूस्टर डोसची व्यवस्था करण्याची गरज आहे.”

डॉ. गुलेरिया म्हणाले, “जसजसा वेळ पुढे जाईल तसतशी रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल. त्यामुळे नागरिकांना बूस्टर डोसची गरज लागेल. हा डोस भविष्यात येणाऱ्या नव्या कोरोना विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी पडेल. कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील लसींची रोगप्रतिकारक शक्ती अधिक असेल. या लसी आगामी काळात येणाऱ्या विषाणूंविरुद्ध लढण्यातही मदत करतील.”

“बूस्टर डोस लस घेणाऱ्याला अधिक विषाणूंपासून संरक्षण”

“बूस्टर लसींच्या चाचणी आधीपासून सुरू आहे. एकदा संपूर्ण लोकसंख्येला पहिले दोन डोसचं लसीकरण पूर्ण झालं की त्यानंतर बूस्टर डोस देण्यासाठी पावलं उचलावी लागतील. हा बूस्टर डोस लस घेणाऱ्याला अधिक विषाणूंपासून संरक्षण देईल,” असंही गुलेरिया यांनी नमूद केलं.

सप्टेंबरपर्यंत लहान मुलांनाही लस मिळणार

डॉ गुलेरिया यांनी लहान मुलांच्या लसीकरणावरही भाष्य केलं. सप्टेंबर 2021 पर्यंत लहान मुलांच्या लसीकरणासाठी देखील लसी उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, “भारतात सप्टेंबरपर्यंत लहान मुलांचं लसीकरण (Vaccination) सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास मोठी मदत होईल. मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची चाचणी सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत त्याचा अहवाल येण्याची आशा आहे. फायजर लसीला याआधीच FDA कडून मंजुरी मिळालीय. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत लहान मुलांचं लसीकरण सुरू होईल.”

भारतात कोरोना लसींचा तुटवडा का?

देशातील कोरोना लसींच्या तुटवड्यावर बोलताना गुलेरिया म्हणाले, “लस उपलब्ध होण्यातील दिरंगाईची अनेक कारणं असू शकतात. कंपन्यांकडे सरकारला देण्यासाठी लसीचे डोस असायला हवेत. कारण त्यांना अनेक देशांकडून प्री-बुक ऑर्डर मिळालेल्या आहेत’.

हेही वाचा :

कांदिवलीत बनावट लस मिळालेल्या 390 नागरिकांचंही लसीकरण होणार, पालिकेकडून अॅक्शन प्लॅनची घोषणा

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीसह अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा, लसीकरणाचा वेग मंदावला

व्हिडीओ पाहा :

AIIMS director comment on Corona Vaccine booster dose and new variants

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.