AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care: कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल की कोरफड जेल… कोणते आहे सर्वोत्तम?

तेलकट, कोरडी आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना त्यांच्या त्वचेची प्रत्येक ऋतूत खुप काळजी घ्यावी लागते. अशातच तुमची त्वचा यापैकी एक असेल आणि त्वचा अनेकदा कोरडी होते, तर अशावेळेस तुम्ही त्वचा कोरडी होऊ नये यासाठी घरगुती उपाय करताना त्वचेवर नारळाचे तेल किंवा कोरफड जेलचा वापर करता. पण अनेक लोकं संभ्रमात असतात की कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाचे तेल लावणे योग्य आहे की कोरफड जेल लावणे? तर आजच्या या लेखात याबद्दल जाणून घेऊयात...

Skin care: कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल की कोरफड जेल... कोणते आहे सर्वोत्तम?
| Edited By: | Updated on: Jun 24, 2025 | 2:57 PM
Share

पावसाळा ऋतू सुरू झाला की आपल्याला आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घ्यावी लागते. खासकरून तेलकट त्वचा, कोरडी त्वचा, संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना त्वचेची या दिवसांमध्ये अधिक काळजी घ्यावी लागते. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात आर्द्रत व दमटपणा असतो,त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशातच त्वचा कोरडी पडू लागते. कारण कोरड्या त्वचेला पोषणाची जास्‍त गरज भासते. यासाठी कोरड्या त्वचेची काळजी घेताना त्वचेला डीप मॉइश्चरायझर करणे महत्वाचे आहे. अशावेळेस अनेकजण स्किन केअर करताना घरगुती उपायांचा अवलंब करतात. तर काही घरगुती उपाय करताना मात्र कोरडया त्वचेला नारळाचे तेल लावणे योग्य आहे की कोरफड जेल लावणे योग्य आहे या संभ्रमात बहुतेकजण असतात. तर आजच्या या लेखात आपण कोरड्या त्वचेवर कोरफड जेल की नारळाचे तेल लावणे सर्वोत्तम आहे ते जाणून घेऊयात…

नारळाचे तेल असो किंवा कोरफड जेल असो दोन्हीही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. या दोन्ही गोष्टी तुमच्या कोरड्या त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करतात. तर यावेळी दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलच्या डॉ. दीपाली भारद्वाज यांनी कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी नेमकं कोणती गोष्ट त्वचेवर लावणे योग्य आहे याबद्दल सांगितलेले आहे ते जाणून घेऊयात.

जेव्हा त्वचेच्या हायड्रेशनचा विचार केला जातो तेव्हा कोरफड आणि नारळ तेल दोन्ही खूप फायदेशीर मानले जातात. परंतु तुम्हाला अनेकदा प्रश्न पडला असेल की या दोन्ही गोष्टींपैकी कोणती तुमच्या त्वचेसाठी जास्त फायदेशीर आहे. दोन्ही गोष्टींमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे त्वचेचा कोरडेपणा कमी करतात.

– डॉ. दीपाली भारद्वाज सांगतात की कोरफड आणि नारळाचे तेल दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर असले तरी, दररोज नारळाचे तेल त्वचेवर लावल्याने ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर नारळाच्या तेलाने मालिश करू शकता. तर दुसरीकडे कोरफड जेलबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे त्वचेच्या ॲलर्जी कमी करण्यास मदत करतात आणि कोरडेपणाच्या समस्येपासून देखील आराम देतात.

– आपण जर कोरफड जेलबद्दल बोलायचे झाले तर त्याची पोत हलकी असते आणि ही जेल त्वचेला थंडावा देण्यास मदत करते. तसेच कोरफड जेल ही प्रत्येक ऋतूसाठी सर्वोत्तम आहे. तर कोरड्या त्वचेला हायड्रेट करण्यासाठी कोरफड जेल फायदेशीर आहे. म्हणून, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात ही जेल त्वचेवर लावावे. यामुळे सनबर्न आणि टॅनिंग सारख्या समस्या देखील कमी होतात.

– नारळाचे तेल कोरड्या त्वचेवर ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच त्वचेला थोडे चमकदार बनवते. कारण नारळाच्या तेलात असलेले फॅटी ॲसिड त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करतात. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर हे तेल भेगा पडलेल्या त्वचेला बरे करण्यास मदत करते.

-जर तुमची त्वचा कोरडी आणि संवेदनशील असेल तर कोरफड तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे कारण ते हलके मॉइश्चरायझर म्हणून काम करते. दुसरीकडे, जर तुमची त्वचा खूप कोरडी झाली असेल तर तुम्ही नारळाचे तेल लावावे. तुम्हाला हवे असल्यास, रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर थोडेसे नारळाच्या तेलाने मालिश करू शकता. त्याच वेळी, दिवसा उन्हात बाहेर जाण्यापूर्वी कोरफड जेलचा वापर करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी