Health Tips : सकाळी सकाळी रिकाम्यापोटी या गोष्टी टाळा, अन्यथा आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील!

अनेकांना सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिणे आवडते. पण आयुर्वेदात या गोष्टी रिकाम्या पोटी पिणे हानिकारक मानले जाते. कॉफी आणि चहामध्ये काही अम्लीय पदार्थ असतात. ज्यामुळे अपचन होते. याशिवाय अॅसिडिटी देखील होऊ शकते. जर तुम्हाला कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असेल तर त्याआधी दोन किंवा चार बिस्किटे खा.

Health Tips : सकाळी सकाळी रिकाम्यापोटी या गोष्टी टाळा, अन्यथा आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील!
आरोग्य

मुंबई : आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्यापैकी बरेच जण अनेक गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. त्याचा आपल्या आरोग्यावर सर्वात मोठा परिणाम होतो. विशेषतः महिला आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात स्वतःकडे लक्ष देत नाहीत. कित्येक वेळा त्या वेळेवर अन्न खात नाहीत. ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते. याशिवाय सकाळी नाश्ता न करता फक्त चहाचेच सेवन केले जाते. रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊया. (Avoid doing these things on an empty stomach in the morning)

रिकाम्या पोटी कॉफी पिऊ नका

अनेकांना सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिणे आवडते. पण आयुर्वेदात या गोष्टी रिकाम्या पोटी पिणे हानिकारक मानले जाते. कॉफी आणि चहामध्ये काही अम्लीय पदार्थ असतात. ज्यामुळे अपचन होते. याशिवाय अॅसिडिटी देखील होऊ शकते. जर तुम्हाला कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असेल तर त्याआधी दोन किंवा चार बिस्किटे खा आणि नंतर कॉफी प्या.

काय खाऊ नये

आयुर्वेदात सकाळी काही गोष्टींचे सेवन न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामध्ये दही, टोमॅटो, औषधे, मिठाई, केळी आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. या सर्व गोष्टींमध्ये अॅसिडचे प्रमाण जास्त असते, जे रिकाम्या पोटी खाल्ल्यास समस्या निर्माण होऊ शकते.

रिकाम्या पोटी झोपू नका

अनेकांना सकाळी उशिरापर्यंत झोपायची सवय असते. जास्त वेळ न खाल्ल्याने आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे तुमची पचनसंस्था कमकुवत होते आणि वजनही वाढते.

सकाळचा नाश्ता टाळू नका

आपल्या सर्वांना माहित आहे की सकाळचा नाश्ता अर्थात ब्रेकफास्ट आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. त्यात बरेच पौष्टिक घटक उपस्थित असतात. बरेच लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळीची न्याहारी घेणे टाळतात. मात्र, सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा आपण सकाळी उठता तेव्हा रात्रभर पोटात काहीच न गेल्यामुळे आपला चयापचय दर कमी होतो. यामुळे आपली फॅट बर्निंग प्रक्रिया गती मंद होते. म्हणूनच सकाळी जागे झाल्यानंतर तासाभरात काहीतरी खाणे महत्वाचे आहे.

चयापचय दर वाढवण्यासाठी, दररोज सकाळी न्याहारी करा. या ब्रेकफास्टमध्ये आपण अंडी, ओट्स, उपमा, इडली इत्यादी पौष्टिक पदार्थ घेऊ शकता. सकाळी फायबर समृद्ध पदार्थ खाल्ल्याने तुमचे पोट बर्‍याच वेळेस पूर्ण दिवस भरलेले राहते. यामुळे, अरबट-चरबट आणि चटपटीत तेलकट पदार्थ खाणे टाळले जाते. असे पदार्थ खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू लागते. जेव्हा, आपण आपला सकाळचा नाश्ता वगळता, तेव्हा आपण आपली क्रेविंग वाढवण्याचे काम करता आणि आपली सर्व मेहनत व्यर्थ ठरते.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Avoid doing these things on an empty stomach in the morning)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI