Health Care : अल्सरपासून ते त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी सुपारी अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी सुपारी अत्यंत फायदेशीर आहे. सुपारी आणि ताकासोबत खाल्ल्याने आतड्यांचे आजार कमी होण्यास मदत होते. तसेच आपल्याला पोटदुखीची समस्या असेल तर आपण सुपारी रात्री पाण्यात भिजवावी आणि सकाळी अर्धा तास ते उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी प्या. यामुळे पोटदुखीची समस्या काही मिनिटांमध्ये दूर होईल.

Health Care : अल्सरपासून ते त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी सुपारी अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!
सुपारी

मुंबई : भारतीय संस्कृतीत सुपारीला खूप महत्व आहे. सुपारीचा उपयोग कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा पूजा पाठ करताना केला जातो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? सुपारी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अशक्तपणा, पचन आणि बद्धकोष्ठता या आजारांपासून मुक्त होण्यासाठी सुपारीचा वापर केला जातो. सुपारी अनेक रोगांवर उपचार आणि प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त आहे.

पोटासाठी फायदेशीर

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी सुपारी अत्यंत फायदेशीर आहे. सुपारी आणि ताकासोबत खाल्ल्याने आतड्यांचे आजार कमी होण्यास मदत होते. तसेच आपल्याला पोटदुखीची समस्या असेल तर आपण सुपारी रात्री पाण्यात भिजवावी आणि सकाळी अर्धा तास ते उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी प्या. यामुळे पोटदुखीची समस्या काही मिनिटांमध्ये दूर होईल.

बद्धकोष्ठता आणि अल्सर

आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास आपण सुपारीचे सेवन केले पाहिजे. यामुळे पाचन तंत्र चांगले होते. अनेक लोकांना अल्सरची खूप मोठी समस्या आहे. अल्सर येण्याचे प्रमाण एवढे जास्त असते की, त्यालोकांना जेवन करायला देखील त्रास होता. जर तुम्हाला हा अल्सरचा त्रास असेल तर तुम्ही सुपारीच्या खाल्लीतर तुमची ही समस्या दूर होऊ शकते.

दातांसाठी फायदेशीर

आपण नेहमी ऐकले असेल की, दातांसाठी सुपारी चांगली नसते. सुपारी खाल्ल्याने दात किडतात. मात्र, आपल्या दातांसाठी सुपारी अत्यंत फायदेशीर आहे. सुपारीचे बारीक पावडर तयार करा. त्यानंतर त्या पावडरने आपल्या दातांची मालिश करा. यामुळे दातदुखी आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

सांधेदुखी आणि डोकेदुखी 

आपल्याला पाठीचा त्रास, सांधेदुखी, डोकेदुखी इत्यादींचा त्रास होत असेल तर आपण सुपारी घ्यावी. सुपारीमध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्याला स्नायूंच्या वेदनांपासून आराम देतात. विशेष म्हणजे सुपारी खाल्ल्याने शरीराच्या वेदना कमी करण्यास मदत होते.

त्वचेसाठी फायदेशीर

सुपारी आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्वचेवर काही मार लागला असेल तर ती जखम बरी करण्यासाठी सुपारी खूप फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला सुपारीची बारीक पावडर तयार करावी लागेल आणि ती पावडर जखमेवर लावा. यामुळे त्वचेवर डाग पडणार नाही.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Betel nut is extremely beneficial for health)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI