‘या’ गंभीर आजाराला झुंज देतेय ‘Bigg Boss 17’ मधील सर्वात क्यूट स्पर्धक; आजच्या पिढीमध्ये आजाराचं प्रमाण मोठं?
Bigg Boss 17 : 'या' आजाराचं आजच्या काळातील पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, 'बिग बॉस १७' 'ही' स्पर्धक देखील करते आजाराचा सामना... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या प्रकृतीची चर्चा... तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल 'हा' आजार नक्की कोणता? सर्वत्र चर्चांना उधाण...

मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 : ‘बिग बॉस १७’ (Bigg Boss 17) मध्ये अनेक वाद होताना पाहायला मिळत आहे. स्पर्धक कायम एकमेकांवर आरोप करताना दिसत आहे. वादग्रस्त ‘बिग बॉस’ शोच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यामुळे बिग बॉसच्या स्पर्धकांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक असतात. ‘बिग बॉस १७’ सर्वात क्यूट स्पर्धक आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची बहीण मन्नारा चोप्रा सध्या तुफान चर्चेत आहे. मन्नारा एका गंभीर आजाराला झुंज देत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मन्नारा चोप्रा हिची चर्चा रंगत आहे.
नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये, मन्नारा प्रचंड भावुक झाली होती. एवढंच नाही तर, अभिनेत्री चिंताग्रस्ततेचा धक्का (Anxiety Attack) बसला. ज्यामुळे मन्नारा हिच्या प्रकृतीबद्दल चाहते चिंता व्यक्त करत होते. अशात Anxiety Attack काय असतं? केव्हा एंग्जायटी अटॅक येतो… एंग्जायटी अटॅकची समस्या आजच्या काळातील पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशी अनेक प्रश्न तुम्हाला देखील पडली असतील…
काय आहे एंग्जायटी अटॅक?
एंग्जायटी अटॅक एक मानसिक अडचण आहे. नकारात्मक विचार करणाऱ्यांना एंग्जायटी अटॅकचा धोका असतो. कधीकधी मेंदूच्या स्नायूंवर ताण आल्यानेही एंग्जायटी अटॅक येण्याची शक्यता असते. सांगायचं झालं तर, सतत एखाद्या गोष्टीचा ताण घेतला किंवा विचार केल्यास एंग्जायटी अटॅक येवू शकतो. त्यामुळे स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवणं एकच एंग्जायटी अटॅकवर उपाय आहे.
का एंग्जायटी अटॅकचा करावा लागतो सामना?
– कुटुंबातील समस्या / अडचणी
– कामाचा अधिक ताण
– शाळेमध्ये कोणत्याप्रकारचा तणाव
– आयुष्यात सतत होत असलेले बदल
– रिलेशनशिपमधील समस्या
– कोणत्या जुन्या आजारातं निदान होवू न शकणं
एंग्जायटी अटॅक येण्याची लक्षणं
– श्वास घेताना त्रास जावणे, घाम येणे
– हृदयाचे ठोके अचानक वाढणे
– कोरडे तोंड होणे, अस्वस्थता आणि छातीत दुखणे
– सिडिटीचा त्रास, झोप न लागणे
– पोटात कोणत्या प्रकारची हालचाल आणि भूक न लागणे, खूप अशक्त वाटणे
एंग्जायटीवर कशी मात कराल
एंग्जायटीवर मात करण्यासाठी स्वतःला आवडत असलेली कामे करा, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. एंग्जायटी अटॅक येईल असं वाटत असल्याचं दिर्घ श्वास घ्या. स्वतःवर असलेला ताण – तणाव सर्वात आधी कमी करण्याचा प्रयत्न करा. योग्य आहार घ्या. नियमित व्यायाम करा. कुटुंब आणि मित्र – परिवारासोबत वेळ व्यतीत करा… एकत्र अनेक कामांचं ओझं स्वतःवर घेवू नका.
Disclaimer : लेखात नमूद केलेल्या पद्धती, सूचनांचा वापरपूर्वी डॉक्टर किंवा संबंधित तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
