AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाची लस संपूर्ण देशवासियांना मोफत मिळणार; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

कोरोनाची लस मोफत मिळणार की विकत मिळणार? याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं असतानाच केवळ दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोना लसीचं मोफत वितरण केलं जाणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. (corona vaccine will get free everyone says Dr. Harsh Vardhan)

कोरोनाची लस संपूर्ण देशवासियांना मोफत मिळणार; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा
| Updated on: Jan 02, 2021 | 12:30 PM
Share

नवी दिल्ली: कोरोनाची लस मोफत मिळणार की विकत मिळणार? याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं असतानाच केवळ दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोना लसीचं मोफत वितरण केलं जाणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. (corona vaccine will get free everyone says Dr. Harsh Vardhan)

कोरोना लसीचं कोणत्याही क्षणी वितरण केलं जाण्याची शक्यता असल्याने संपूर्ण देशभरात टिकाकरणाचे ड्राय रन घेतले जात आहे. दिल्लीतही या ड्राय रनचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन गुरु तेग बहादूर सिंग रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांना कोरोनाची लस दिल्लीतील जनतेलाच मोफत मिळणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर केवळ दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण भारतातील जनतेला ही लस मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चार राज्यात ड्राय रन करण्यात आलं असून त्याचा फिडबॅक मिळाला आहे. लसीकरणाच्या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या होत्या. त्यात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज ड्राय रन घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हे ड्राय रन सुरू असून यावेळी नियमांचं पालन केलं जात आहे, असं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.

लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. व्हॅक्सीन सुरक्षित ठेवण्यावर आमचा भर आहे. पोलिओ लसीकरणाच्यावेळी अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. तरीही लोकांनी लस टोचून घेतली आणि भारत पोलिओमुक्त झाला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. देशाला लसीकरणाचा अनुभव आहे. कोरोनाची लस जनतेच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, दिल्लीत 1994मध्ये पल्स पोलिओचं अभियान हाती घेण्यात आलं होतं. त्यावेळी सुमारे 10 लाख मुलांना पोलिओची लस देण्यात आली होती. हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला होता. त्यामुळे पोलिओ लसीकरणाच्या वेळी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, नागरिक समाज संघटना आणि इतरांन सोबत घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. (corona vaccine will get free everyone says Dr. Harsh Vardhan)

लस मोफत मिळावी, टोपेंनी केली होती मागणी

कोरोनाची लस मोफत द्यायची की विकत द्यायची याबाबत केंद्र सरकारने कोणतंच स्पष्टीकरण केलेलं नाही. पण केंद्र सरकारने ही लस मोफत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांन केली होती. केंद्र सरकारने दिलेल्या व्हॅक्सीन दिल्यानंतर त्याची अमलबजावणी करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करेल, असंही ते म्हणाले होते. (corona vaccine will get free everyone says Dr. Harsh Vardhan)

संबंधित बातम्या:

जालन्यात कोरोना लसीकरणाची ड्राय रन सुरु, आरोग्यमंत्री टोपेंकडून संपूर्ण कार्यपद्धती समजून घ्या

कोव्हिशिल्ड लसीचे किती डोस तयार, तुम्हाला कशी आणि किती रुपयात मिळणार?

कोरोना काळाने बदलली लोकांची मानसिकता, नैराश्य-मानसिक तणावासारख्या समस्यांवर ‘बिनधास्त बोल’!

(corona vaccine will get free everyone says Dr. Harsh Vardhan)

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.