Covid Center: जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश! पालिका प्रशासनाची कार्यवाही सुरू

ॲक्टिव्ह असलेल्या सात जम्बो कोविड सेंटरमधील सुमारे 15 हजार बेडवर फक्त एक टक्क्यापर्यंतच रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे आठवडाभरात जम्बो कोविड सेंटर बंद करण्यासाठी कार्यवाही सुरू करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

Covid Center: जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश! पालिका प्रशासनाची कार्यवाही सुरू
Covid centerImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 8:35 AM

मुंबई: कोरोना काळात मोठमोठे कोविड सेंटर उभारण्यात आले होते. कारण कोरोना होणाऱ्यांची आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या तेवढीच होती. मुंबईत (Mumbai) कोरोना (Corona) पूर्ण आटोक्यात आला असताना सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणे असणाऱ्यांची संख्या कमी असल्याने रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही केवळ 2 ते 5 टक्क्यांपर्यंत आहे. तर ॲक्टिव्ह असलेल्या सात जम्बो कोविड सेंटरमधील सुमारे 15 हजार बेडवर फक्त एक टक्क्यापर्यंतच रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे आठवडाभरात जम्बो कोविड सेंटर (Jumbo Covid Center) बंद करण्यासाठी कार्यवाही सुरू करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

सेंटर बंद करण्यासंदर्भात आढावा

मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिका आणि राज्य सरकारच्या नियोजनबद्ध कामामुळे तीन लाटा यशस्वीपणे परतवून लावण्यात प्रशासनाला यश आले. मे महिन्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढल्याने दिवसाची रुग्णसंख्या अडीच हजारांपार गेल्याने वाढलेले टेन्शन रुग्णसंख्या 200 ते 250 वर आल्याने पुन्हा एकदा कमी आले झाले आहे. त्यामुळे पालिका प्रशासन जम्बो कोविड सेंटर बंद करण्यासंदर्भात आढावा घेत आहे.

दहा जम्बो कोविड सेंटरची बेडसंख्या एकूण

  • दहिसर चेकनाका, कांदरपाडा 700 बेड (बंद)
  • मालाड जम्बो कोविड सेंटर 2200 बेड
  • नेस्को गोरेगाव फेज-1 – 2221 बेड (बंद)
  • नेस्को गोरगाव फेज-2- 1500 बेड (बंद)
  • बीकेसी कोविड सेंटर- 2328 बेड
  • कांजुरमार्ग कोविड सेंटर- २००० बेड (बंद)
  • शीव जम्बो कोविड सेंटर- 1500 बेड
  • आरसी भायखळा सेंटर- 1000 बेड
  • आरसी मुलुंड जम्बो सेंटर- 1708 बेड
  • सेव्हन हिल्स रुग्णालय, अंधेरी- 1850 बेड

आवश्यकता भासल्यास हे बेड उपलब्ध

तिसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यानंतर दहापैकी दहिसर, गोरगाव आणि कांजुरमार्ग येथील जम्बो कोविड सेंटर याआधीच बंद जम्बो कोविड सेंटर करण्यात आले आहेत. जम्बो कोविडच्या ठिकाणी असणारे बेड आणि आरोग्य सुविधा पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याचे पालिकेचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात येणार असली तरी कोणत्याही स्थितीत जादा बेडची आवश्यकता भासल्यास हे बेड उपलब्ध करण्याच्या स्थितीत ठेवण्यात येतील, असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.