पपई खाऊन बिया फेकू नका, बिया देतात आश्चर्यकारक फायदे , जाणून घ्या
आपल्यापैकी बहुतेक जण पपईला आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानतात, परंतु त्यातील बिया निरुपयोगी समजून फेकून देतो. परंतु पपईच्या बिया देखील पोषक तत्वांनी समृद्ध असतात आणि आरोग्यासाठी बरेच फायदे प्रदान करतात, ज्याबद्दल आपण आज जाणून घेणारा आहोत.

आपलं शरीर आतून निरोगी रहावे यासाठी अनेकजण आहारात बद्दल करतात. पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करून त्यांचे सेवन करतात. अशातच आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या फळांचा विचार केला तर पपई सर्वप्रथम लक्षात येते. हे केवळ पचनसंस्थेसाठीच फायदेशीर नाही तर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास, त्वचा आतून हेल्दी ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. मात्र पपई खाल्ल्यानंतर अनेकजण त्याच्या बिया फेकून देतात. पण पपईच्या बिया औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत.
पपईच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. कारण या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास आणि आरोग्याच्या विविध समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. आज या लेखात पपईच्या बियांच्या अधिक फायद्यांबद्दल चर्चा करूया. त्यांचे सेवन कसे करावे हे देखील जाणून घेऊयात.
पपईच्या बियांचे फायदे
पपईच्या बिया तुमच्या शरीरातील किडनी आणि लिव्हरला डिटॉक्सीफाई करण्यास मदत करतात. तसेच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
पपईच्या बियांमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते, जे अन्न पचवण्यास मदत करते. त्यामुळे पोटातील आतड्यांसंबंधी कृमी काढून टाकण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी देखील ते प्रभावी आहेत.
पपईच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
पपईच्या बियांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे भूक नियंत्रित करतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही पपईच्या बियांचा आहारात समावेश करू शकतात.
पपईच्या बियांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराची प्रतिकार क्षमता वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे रोगांचा धोका कमी होतो.
पपईचे बियांचा वापर कसा करावा?
स्मूदी बनवताना पपईच्या बियांचा वापर करू शकता. यासाठी प्रथम पपईच्या बिया वाळवून त्यांची बारीक पूड करून घ्या, त्यानंतर तुम्ही जेव्हा स्मूदी बनवता तेव्हा त्यात पपईच्या बियांची पूड मिक्स करून त्याचे सेवन करा.
सलाडचे सेवन करताना तुम्ही त्यात पपईच्या बिया देखील मिक्स करू शकता. ते आरोग्यासाठी बरेच फायदे प्रदान करतील. यासाठी प्रथम पपईच्या बिया वाळवून घ्या. नंतर हलके भाजून सलाडमध्ये मिक्स करून सेवन करा.
पपईच्या बिया चवीला कडू असतात. त्यामुळे त्याचे थेट सेवन करता येत नाही. यासाठी बियांचा कडवटपणा कमी करण्यासाठी त्यांना मधात मिसळा आणि नंतर सेवन करा.
पपईच्या बियांचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्सीफाई होण्यास मदत होते. जर तुम्हालाही तुमचे शरीर डिटॉक्स करायचे असेल तर काही बिया पाण्यात उकळून घ्या. नंतर ते पाणी एका पेल्यात गाळून प्या. यामुळे शरीर डिटॉक्सीफाई होण्यास मदत होईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
