Child Care : तुमचं बाळ सर्दीने हैराण आहे का ? मग हे घरगुती उपाय करुन बाळाची सर्दी काही मिनिटांमध्ये दूर करा!

सध्या हिवाळ्याच्या हंगामात सुरू आहे. यामुळे वातावरणामध्ये गारवा मोठ्या प्रमाणात आहे. सध्याच्या या हंगामामध्ये लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यत जवळपास सर्वच जण सर्दी, ताप आणि खोकल्यामुळे त्रस्त आहेत. मात्र, विशेष: लहान मुले. कारण या हिवाळ्याच्या हंगामात लहान मुले सर्वाधिक आजारी पडतात.

Child Care : तुमचं बाळ सर्दीने हैराण आहे का ? मग हे घरगुती उपाय करुन बाळाची सर्दी काही मिनिटांमध्ये दूर करा!
सांकेतिक फोटो

मुंबई : सध्या हिवाळ्याच्या हंगामात (Winter season) सुरू आहे. यामुळे वातावरणामध्ये गारवा मोठ्या प्रमाणात आहे. सध्याच्या या हंगामामध्ये लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यत जवळपास सर्वच जण सर्दी (Cold), ताप आणि खोकल्यामुळे त्रस्त आहेत. मात्र, विशेष: लहान मुले (Baby). कारण या हिवाळ्याच्या हंगामात लहान मुले सर्वाधिक आजारी पडतात. त्यांना सर्दी, ताप, खोकल आणि कफचा त्रास अधिक प्रमाणात होतो.

सर्दीमुळे लहान मुलांची किरकिर अधिक वाढते आणि ते काही खात किंवा पित नाहीत. मग त्यांना खाऊ घालण्यापासून ते त्यांना आैषध देण्यापर्यंत आई-वडिलांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते. सर्दी यादरम्यान मुलांच्या शरीराला हवे असलेले पोषण मिळत नाही. यामुळे मुले अधिकच आजार पडतात आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामध्येही सध्या कोरोनाने हातपाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. यामुळे सध्याच्या वातावरणामध्ये आपण आपल्या बाळांकडे अधिक लक्ष देऊन त्यांना सर्दी होणार नाही. यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे.

पाणी जास्त पाजवा

बाळाला सर्दीचा त्रास सुरू झाल्यावर आपण त्यांना जास्त प्रमाणात पाणी पाजवत नाहीत किंवा आपण पाणी पाजवण्याचा प्रयत्न केला तरी बाळ पाणी पित नाही. मात्र, सर्दी दरम्यान शरीरामध्ये अधिक पाणी असणे खूप महत्वाचे आहे. यामुळे आपल्या बाळाला लाडीगोडी लावून सतत पाणी पाजवत रहा. मात्र, बाळाला सर्दीमध्ये कधीही थंड पाणी न पाजवता नेहमीच कोमट पाणी करूनच पाजवावे. यामुळे त्याच्या छातीत तयार झालेला श्लेष्मा साफ होण्यास मदत होते.

वाफ द्या

बाळाला वाफ देणे हे काही सोपे काम नाहीये. मात्र, वाफ दिल्याने सर्दी लवकर बरी होण्यास मदत होते. यामुळे बाळाला वाफ देण्याचा प्रयत्न करा. वाफ दिल्याने त्याचे बंद नाक उघडेल आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होणार नाही. विशेष म्हणजे तज्ञांच्या मते, कधीकधी बाळाला वाफ दिल्याने बाळाला सर्दीन देखील होत नाही.

स्पंज आंघोळ घाला

जर तुमच्या बाळाला खोकला आणि सर्दीची समस्या असेल तर त्याला स्पंज आंघोळ घाला. यासाठी कोमट पाणी करा आणि नंतर त्यात एक टॉवेल भिजवा आणि बाळाचे शरीर स्वच्छ करा. बाळाला खोलीतच आंघोळ घालण्याचा प्रयत्न करा.

तेलाने मालिश

लसूण आणि मोहरीच्या तेलाची मालिश बाळासाठी सर्वोत्तम मानली जाते. असे म्हणतात की बाळाला सर्दी झाली असेल तर रात्री झोपताना त्याच्या अंगाला तेलाने मालिश करावी. यासाठी मोहरीच्या तेलात लसणाची काढी गरम करा आणि थंड झाल्यावर बाळाला मसाज करा. यामुळे सर्दीमध्ये देखील बाळाला आराम मिळेल.

आहारात जास्त लिक्विडचा समावेश करा

जर बाळाला खोकला आणि सर्दी झाली असेल तर त्याच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. त्यामुळे त्याला डायरियाचा त्रासही होऊ शकतो. बऱ्याच वेळा डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे मुलाला जुलाबचा त्रास होतो. अशा परिस्थितीत त्यांच्या आहारामध्ये लिक्विडचा समावेश जास्त प्रमाणात करा.

थंड वाऱ्यापासून दूर ठेवा

जर आपले बाळ लहान असेल तर त्याला या हंगामात बाहेर कुठे घेऊन जाऊ नका. कारण सध्याच्या हंगामामध्ये वारे खूप थंड असते. यामुळे बाळाला सर्दी लवकर होण्याची शक्यता असते. तसेच बाळाला थंड पाण्यामध्ये बिलकुल खेळू देऊ नका.

(टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या : 

Jujube Fruit | कोरोनामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे ? चिंतो नको फक्त बोर खा !

Kidney Disorder Symptoms | किडनी खराब झाल्याची ही आहेत 5 महत्त्वाची लक्षणे, जाणून घ्या


Published On - 9:34 am, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI