Jujube Fruit | कोरोनामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे ? चिंतो नको फक्त बोर खा !

Jujube Fruit | कोरोनामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे ? चिंतो नको फक्त बोर खा !
jujube

सध्या मात्र आपल्या सर्वांनाच माहिती असणाऱ्या रानफळांपैकीच बोर हे फळदेखील खूप पौष्टिक असल्याचे समोर आले आहे. खुद्द सिलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रूजुता दिवेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 07, 2022 | 1:57 PM

मुंबई : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात रोग प्रतिकाशक्ती वाढवणारे फळ तसेच अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातोय. फळांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. आहारामध्ये फळांचा नियमितपणे समावेश केला तर शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. सध्या मात्र आपल्या सर्वांनाच माहिती असणाऱ्या रानफळांपैकीच बोर हे फळदेखील खूप पौष्टिक असल्याचे समोर आले आहे. खुद्द सिलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रूजुता दिवेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

बोर या फळामध्ये नेमकं काय असतं ?

बोर खाल्ल्याचे काय फायदे आहेत याबाबत सविस्तर माहिती दिवेकर यांनी दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी ही माहिती दिलीय. दिवेकर यांनी सांगितल्याप्रमाणे, बोरामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, अँटीऑक्सिडंट तसेच व्हिटॅमिन ए असे महत्त्वाचे घटक असतात. आपल्या शरीरात अमिनो अॅसिडची खूप गरज असते. बोरा या फळामध्ये 24 पैकी 18 अमिनो अॅसिड असतात. बोरामध्ये फायबरदेखील असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बोर खाने हा एक चांगला पर्याय ठरु शकतो.

रुजुता दिवेकर यांनी काय माहिती दिली ?

रजुता दिवेकर यांनी बोराचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांनी आपण या हिवाळ्यात बोर खात आहात का ? असा प्रश्न विचारला. बोर या फळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. तसेच बोर हे इम्यूनिटी-बूस्टिंग फ्रूट असून त्यामध्ये विटॅमीन सीचे प्रमाणही बरेच असते, असे दिवेकर यांनी म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rujuta Diwekar (@rujuta.diwekar)

बोर हे लो कॅलरी फूड

बोर हे एक कमी कॅलरी असणारे फळ आहे. तसेच बोरामध्ये अँटिऑक्सिडंट तसेच पोटॅशियमचे प्रमाण जास्त असतात. यामुळेच शरीरातील ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी या फळाचा चांगलाच उपयोग होतो. फक्त योग आणि प्राणायामच नाही तर बोर हे फळ खाल्ल्यामुळेदेखील रो प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते.

इतर बातम्या :

Skin Care Beauty Tips | हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते ? मग हे घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

Lips Care : हे होममेड लिप स्क्रब ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल!

Skin Care : या गोष्टी कॉफीसोबत चुकूनही घेऊ नका, होऊ शकते मोठे नुकसान!


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें