केस गळतीच्या समस्येपासून मिळवायचीये सुटका?, तर मग या चार गोष्टींना बनवा रुटीन

केस गळतीच्या समस्येपासून मिळवायचीये सुटका?, तर मग या चार गोष्टींना बनवा रुटीन

हिवाळ्यात केसांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. कोरडेपणामुळे केस तुटू लागतात आणि खडबडीत होतात. त्यामुळे केसांमध्ये खाज सुटणे, केसात कोंडा होणे. अशा विविध समस्या निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 27, 2022 | 6:15 AM

हिवाळ्यात (Winter) केसांच्या (hair problems) आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. कोरडेपणामुळे (Dryness) केस तुटू लागतात आणि खडबडीत होतात. त्यामुळे केसांमध्ये खाज सुटणे, केसात कोंडा होणे. अशा विविध समस्या निर्माण होतात. विशेष: गरम पाण्याने डोके धुलल्यानंतर या समस्या आणखी वाढतात. या समस्या टाळण्याासाठी केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. जर थंडीच्या प्रभावामुळे तुमचेही केस खराब होत असतील तर तुम्हाला तुमच्या काही सवयी बदलण्याची गरज आहे. या सवयी बदलून तुम्ही तुमचे केस सुंदर आणि निरोगी बनवू शकता. शरीराला जशी पोषणाची गरज असते, तशीच केसांनाही असते. केसांचे पोषण करण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा तरी केसांची मॉलिश करा. मॉलिश साठी तुम्ही तिळाचे तेल, खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. जर मोहरीचे तेल शुद्ध असेल तर तेही चालेल. रात्रभर ते तेल तसेच डोक्याला राहुद्या आणि सकाळी डोके धुऊन टाका.

वारा आणि उन्हापासून केसांचे संरक्षण करा

जास्त वारा आणि कडक सूर्यप्रकाशामुळे केसांचे नुकसान होते. त्यामुळे केस वाळायला लागतात आणि केसांच्या त्वचेवर कोरडेपणा येतो आणि कोंडा वाढतो. त्यामुळे तुम्ही जेव्हाही घराबाहेर पडाल तेव्हा तुमचे केस स्कार्प किंवा इतर साधनांनी व्यवस्थित झाका.

गरम पाण्याने केस धुवू नका

हिवाळ्यात अनेक जण आपले केस गरम पाण्याने धुतात, मात्र असे करणे हे तुमच्या केसांसाठी हानीकारक आहे. गरम पाण्यामुळे केस कोरडे आणि कमकुवत आणि निर्जीव होऊ शकतात. त्याऐवजी केस धुण्यासाठी कोमट किंवा थंड पाणी वापरा. तसेच केस नुसते पाण्याने न धुता त्याच्यासोबत शाम्पू किंवा कंडिशनरचा वापर करा.

रात्री झोपताना वेणी घालून झोपा

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या केसांची घट्ट अशी वेणी घालून झोपा. त्यामुळे तुमच्या केसांना अधिक रक्तपुरवठा होतो. रक्तपुरवठा मोठ्याप्रमाणात झाल्याने केसांची वाढ चांगली होते.

संबंधित बातम्या

Health : फुफ्फुसाला ठेवायचं आहे निरोगी मग टाळा ‘या’ गोष्टी…

जेवन केल्यानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन टाळा; अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार

Budget 2022: सरकार हेल्थकेअर क्षेत्रात मोठ्या बदल करण्याच्या तयारीत? काय असणार आहे नेमका प्लान

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें