AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विविध आरोग्य समस्यांवर फायदेशीर आले; जाणून घ्या याचे लाभदायी गुणधर्म

आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे जळजळ संबंधित समस्या दूर करण्यात मदत करते. (ginger benefits on various health issues; know about it)

विविध आरोग्य समस्यांवर फायदेशीर आले; जाणून घ्या याचे लाभदायी गुणधर्म
विविध आरोग्य समस्यांवर फायदेशीर आले
| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 8:55 AM
Share

मुंबई : आल्याचा वापर बर्‍याच प्रकारच्या आहारात केला जातो. घशात संक्रमण, सर्दी, खोकला आणि डोकेदुखी यासारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. यात शोगॉल, पॅराडोल, झिंगरोन आणि जिंझरोल यांसारखे अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हे गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चहाची चव वाढवण्यासाठी तसेच आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी चहामध्ये आले वापरले जाते. बर्‍याच प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये आल्याचा वापर होतो. आले हे पोटात दुखण्यापासून कर्करोगापर्यंतच्या अनेक समस्या रोखण्यासाठी कार्य करते. (ginger benefits on various health issues; know about it)

वेदनांपासून मुक्ती

आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे जळजळ संबंधित समस्या दूर करण्यात मदत करते. आपण जळजळ, सूज, तीव्र वेदना, सर्दी यांसारख्या व्याधींनी त्रस्त असल्यास आल्याचे सेवन करू शकता. सूज आल्यास त्यावर आल्याचा दाह हा प्रभावी उपचार आहे. आले हे एक नैसर्गिक वेदनानिवारक म्हणूनदेखील ओळखले जाते.

हृदयरोगाचा धोका कमी करते

आल्यामध्ये व्हिटॅमिन के असते. आले हृदयरोग तसेच झटक्याचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. आल्याला व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत म्हटले जाते. रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका रोखण्यात आल्याची फार मोठी मदत होते.

बुरशीजन्य संसर्ग रोखण्यास उपयुक्त

आल्यामध्ये बुरशीजन्य संसर्ग रोखणारे विविध गुणधर्म असतात. तोंडातील बुरशीजन्य संक्रमण रोखण्यासाठीही आल्याची मदत होते.

कर्करोगाचा धोका वाढण्यापासून बचाव

आल्यामध्ये जिंझोल नावाचा एक कंपाऊंड असतो. हा घटक ओवेरियन, प्रोस्टेट आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवतो.

मळमळचा त्रास थांबतो

आले हे मळमळ आणि उलटीचा त्रास थांबवण्यासाठी ओळखले जाते. आल्याच्या वापरापासून कमीत कमी दुष्परिणामांची शक्यता असते. मात्र आल्याचे सेवन केल्यामुळे मळमळ होण्याची लक्षणे कमी करण्यास मोठी मदत होते. आल्याचा उपयोग बर्‍याच वर्षांपासून सकाळच्या आजारावर उपचार करण्यासाठी केला जात आहे.

अन्न विषबाधेपासून दिलासा

आल्याचे सेवन केल्याने अन्न विषबाधा, लूज मोशन, सर्दी आणि ताप यांसारख्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. आल्याचे नियमित सेवन पचनव्यवस्था तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.

ब्राउन शुगर आणि आल्याचा चहा पिल्याने मासिक पाळीदरम्यान वेदना आणि पोटातील दुखणे दूर होते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येवर विजय मिळविण्यासाठी आपण आल्याचे सेवन करू शकता. यावरून तुम्हाला कल्पना आली असेल कि रोजच्या वापरात असलेले आले आपल्याला किती उपयुक्त ठरू शकेल. (ginger benefits on various health issues; know about it)

इतर बातम्या

फेसबुक, ट्विटर आणि गुगलने या देशाला दिली धमकी; जाणून घ्या कारण

क्रेडिट कार्ड वापरा, पण प्रत्येक ठिकाणी नाही; जाणून घ्या आरबीआयचे नियम

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.