AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Handwash Health News : साबणाने 20 सेकंद हात धुतले तर हे 3 आजार कधीच नाहीत होणार, जाणून घ्या!

Health News : तुमचे घाणेरडे हात अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देण्यास मदत करतात. त्यामुळे प्रत्येकाने हात धुणे खूप गरजेचे आहे. तर प्रत्येकाने दररोज 20 सेकंद हात धुणे गरजेचे आहे, जेणेकरून आपला अनेक गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत होईल.

Handwash Health News : साबणाने 20 सेकंद हात धुतले तर हे 3 आजार कधीच नाहीत होणार, जाणून घ्या!
| Updated on: Oct 15, 2023 | 7:19 PM
Share

मुंबई : सध्याच्या काळात प्रदूषण, घाण, साथीचे रोग पसरताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यात बदलत्या वातावरणामुळे विषाणूजन्य रोग मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहेत. कोणी शिंकलं तरी त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तीला लगेच आजार होण्याची शक्यता असते. त्यात सध्याच्या धावपळीच्या जगात लोक स्वतःकडे लक्ष देण्याचे देखील विसरतात. मग साधं ते हात धुवायचं देखील विसरून जातात. कुठेही अस्वच्छ ठिकाणी  स्पर्श करणे किंवा शिंकणे अशा वेळी लोक हात धुवायचं विसरून जातात, त्यामुळे त्यांना अनेक गंभीर समस्यांचा, आजारांचा सामना करावा लागतो.

आजकाल श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. लोकांना धुळीची ॲलर्जी असते किंवा वाढते प्रदूषण यामुळे लोकांना श्वसनाचे आजार निर्माण होताना दिसतात. त्यात आपले अस्वच्छ हात त्यामुळे आपल्याला अनेक संसर्ग निर्माण होण्याची शक्यता असते. आपले घाणेरडे हात आपण आपल्या तोंडाला, नाकाला स्पर्श करतो त्यामुळे आपल्या शरीरात संसर्ग पसरतात. मग सर्दी, ताप, खोकला असे अनेक आजार निर्माण होतात. तर अशा आजारांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी दररोज 20 सेकंद हात धुणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा गंभीर समस्यांचा आपल्याला सामना करावा लागणार नाही.

सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे अनेक संसर्ग निर्माण होताना दिसतात. बदलत्या वातावरणामुळे विषाणूजन्य रोगांचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे एकाकडून दुसऱ्याला आजार निर्माण होण्याची शक्यता असते. तर असे विषाणूजन्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने आपले हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याला अशा विषाणूजन्य आजारांचा सामना करावा लागणार नाही.

प्रत्येकाने दररोज जेवणाआधी हात धुणे गरजेचे आहे. जर तुम्ही अस्वच्छ हाताने जेवण केले तर तुमच्या पोटात अनेक संसर्ग निर्माण होण्याची शक्यता असते. तुमच्या हातावर जंतू असतात तेच तुमच्या पोटात जातात त्यामुळे तुम्हाला अनेक पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये पोटदुखी, उलट्या मळमळ अशा अनेक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे कधीही कोणताही पदार्थ खाण्याअगोदर तुमचे हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे, जेणेकरून पोटाशी संबंधित समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.