Health Tips : योगा करताना चक्कर येते? ‘हे’ उपाय करा फरक जाणवेल…

Health Tips : योगा करताना चक्कर येते? 'हे' उपाय करा फरक जाणवेल...
चक्कर येत असेल तर हे उपाय करा...

Health Tips : योगा करताना कधी-कधी योगा करत चक्कर येते .चक्कर येण्याकडे दुर्लक्ष केल्यास न्यूरो डिसऑर्डरसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Mar 27, 2022 | 2:03 PM

मुंबई : सध्या चांगल्या आरोग्यासाठी सगळेचजण योगा (Yoga) करताना दिसतात. योगासनं केल्याने आरोग्यासाठी खूप चांगले फायदेही होतात. या योगामुळे अनेक लोकांना त्याचा फायदा देखील झाला आहे. योगा करत असताना त्याच्याशी संबंधित माहिती जाणून घेणं, आवश्यक असतं. काहीवेळा लोक योगासनं करायला लागतात आणि त्याची पद्धत चुकली की फायद्याऐवजी त्याचे परिणाम जाणवू लागतात. योगा करताना कधी-कधी योगा करत चक्कर येते (dizziness) .चक्कर येण्याकडे दुर्लक्ष केल्यास न्यूरो डिसऑर्डरसारख्या (Neuro Disorders) गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला योगा करताना चक्कर आल्यास काय उपाय करता येतील ते सांगणार आहोत. चक्कर येण्यामागे बरीच कारणं असू शकतात. या कारणांचा मागोवा घेऊयात…

चक्कर का येते?

जर तुम्ही बराच काळ व्यायाम करत असाल आणि त्यानंतर लगेच योगासनं सुरू केलीत तर तुम्हाला चक्कर येऊ शकते. कधीकधी रक्तातील साखर कमी असतानाही चक्कर येऊ शकते. जर तुम्हाला शुगर असेल तर योगासने करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.डिहायड्रेशनच्या समस्येमुळे योगा करताना चक्कर येऊ शकते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता कोणत्याही परिस्थितीत होऊ देऊ नये. या व्यतिरिक्त जर तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल तर तुम्हाला योगा करताना चक्कर येऊ शकते.

उपाय काय आहेत?

पुरेशी झोप घ्या – योगासनं करण्यापूर्वी चांगली झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही, तर तुम्हाला थकवा जाणवेल आणि तुम्ही योगा योग्य प्रकारे करू शकणार नाही. यामुळेही चक्कर येऊ शकते. केवळ योगाच नाही तर वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वीही पूर्ण झोप घेणं खूप गरजेचं आहे.

पोटातून श्वास घ्या – योगासन करताना श्वास नीट घेतला नाही तर चक्कर येऊ शकते. योग करताना नेहमी पोटातून श्वास घ्यावा असं म्हणतात. या स्थितीत तुम्हाला खूप आराम वाटेल.

योग्य वेळ- योगा, व्यायाम किंवा व्यायामासाठी योग्य वेळ निवडणं आवश्यक असतं. सध्या उन्हाळा आहे आणि त्यात कधीही योगा केल्याने चक्कर येऊ शकते. उन्हाळ्यात सकाळी लवकर योगा करणं चांगलं असतं. याचं मुख्य कारण म्हणजे या काळात हवामान थोडं थंड असतं. या काळात योगा केल्याने मळमळ होणार नाही. चक्करही येणार नाही.

Health Tips : रात्री झोप लागत नाही? ‘या’ पाच गोष्टींचा आहारात समावेश करा आणि फरक अनुभवा…

बद्धकोष्ठतेने त्रस्त आहात? घरगुती उपायांऐवजी ही ट्रीक करून पाहा…

योगा करताना ‘या’ गोष्टींची माहिती तुम्हाला असायलाच हवी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें