Treadmill : ट्रेड मिलवर वर्क आऊट करताना येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, वर्क आऊट करताना थोडं सबूर; ही बातमी वाचाच

Treadmill : आपल्या शारीरिक क्षमता पाहूनच लोकांनी एक्सरसाईज केली पाहिजे. शरीराचीही एक लिमिट असते. अनेकदा अनफिट लोक जीममध्ये बराच वेळ घाम गाळत असतात. प्रमाणापेक्षा अधिक व्यायाम करतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो, असं एक्सपर्ट सांगतात.

Treadmill : ट्रेड मिलवर वर्क आऊट करताना येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, वर्क आऊट करताना थोडं सबूर; ही बातमी वाचाच
ट्रेड मिलवर वर्क आऊट करताना येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, वर्क आऊट करताना थोडं सबूर; ही बातमी वाचाचImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 6:13 PM

मुंबई: प्रसिद्ध हास्य अभिनेता राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रेड मिलवर (Treadmill) वर्क आऊट करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. गेल्या काही काळापासून जीममध्ये वर्क आऊट करताना किंवा घरात एक्सरसाईज (regular exercise) करताना अॅटॅक येण्याचे प्रकार अधिक वाढले आहे. जीममध्ये एक्सरसाईज करणाऱ्या व्यक्तिचा बीपी आणि कोलोस्ट्रेल लेव्हलमध्ये असेल तर याचा अर्थ असा नाही की त्याला हृदयविकाराचा झटका येणार नाही. साधारणपणे अनुवांशिक कारणानेही हृदयविकाराचा झटका येत असतो. याशिवाय खराब लाईफस्टाईलमुळेही हृदयविकाराचा झटका येत असतो. त्यामुळे जीमला (treadmill workouts) जाणाऱ्या तरुणांनी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

वयस्करांना सर्वाधिक धोका

हृदयाशी संबंधित आजाराचा धोका किती मोठा असू शकतो हे आपल्या वयावर अवलंबून आहे. नियमित एक्सरसाईज करणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. मात्र, वाढत्या वयानुसार एक्सरसाईज सुरू ठेवल्यास हृदयाशी संबंधित आजाराचा धोका अधिक असतो. याबाबत एक्सरसाईज फिजिओलॉजिस्ट मायकल जॉयनर यांच्यानुसार, वाढत्या वयापाठोपाठ उच्च रक्तदाब आणि हाय कोलेस्ट्रोलचा धोकाही वाढत असतो. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर नियमित आरोग्य तपासणी करणं आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

एक्सरसाईज करताना हृदयविकाराचा धोका का?

आपल्या शारीरिक क्षमता पाहूनच लोकांनी एक्सरसाईज केली पाहिजे. शरीराचीही एक लिमिट असते. अनेकदा अनफिट लोक जीममध्ये बराच वेळ घाम गाळत असतात. प्रमाणापेक्षा अधिक व्यायाम करतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो, असं एक्सपर्ट सांगतात. मॅरेथॉन रनर्सवर झालेल्या एका संशोधनात अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. जेव्हा लोक रनिंग इव्हेंट पूर्ण करतात तेव्हा त्यांच्या ब्लड सँपलमध्ये हार्ट डॅमेजशी संबंधित बायोमार्कर निर्माण होतात. तथापि, काळानुसार ते रिकव्हरही होतात. परंतु, जेव्हा हृदयावर सातत्याने स्ट्रेस असतो तेव्हा तो टेंपररी डॅमेज गंभीर होतो. त्याशिवाय ज्या लोकांना आधीच हृदयाशी संबंधित आजार आहे, त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक असते.

हेवी वेट ट्रेनिंगपासून सावध

काही लोकांना झटपट मस्क्युलर बॉडी बनवायची असते. त्यामुळे हे लोक प्रमाणापेक्षा अधिक वजन उचलतात. जर तुम्ही काही दिवस जीममध्ये जाऊन असं करत असाल तर तुम्हाला त्याचा त्रास होईल. त्यामुळे तुम्हाला फिट राहायचं असेल तर तुमचा गोल सेट करा आणि त्यानुसार ट्रेनिंग करा, असं अमेरिकेच्या लॉस एन्जिलिसच्या एका हार्ट इन्स्टिट्यूटचे असोसिएट डायरेक्टर सुमित चौग यांनी सांगितलं.

या शारीरिक लक्षणाकडे दुर्लक्ष करा

जेव्हा तुम्हाला कोणता आजार होणार असेल तर तुमचं शरीर तुम्हाला काही संकेत देत असतं. ज्या लोकांना हृदयविकाराचा झटका येतो, त्यांनाही शरीराने संकेत दिलेले असतात. मात्र, ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. एक तृतियांश लोकांना एक आठवड्या आधीच हृदयविकाराशी संबंधित लक्षणे जाणवू लागतात. मात्र, हे संकेत वेळीच ओळखले तर धोका कमी होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जर तुमचं शरीर योग्य रित्या फंक्शन करत नसेल तर काही खास लक्षणांवर लक्ष द्या. श्वास घेण्यास त्रास, छातीत कळ येणं, थकवा जाणवणं आदी गोष्टी जाणवल्यास डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधा, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.