उन्हाळ्यात केस गळतीची समस्या कशी टाळावी? काय घ्यावी काळजी जाणून घ्या सविस्तर
उन्हाळ्यात घाम येत असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक समस्या म्हणजे कोंडा होणे किंवा केस गळणे. कोंडा झाल्याने डोक्याला खाज सुटते आणि हळूहळू केस गळती सुरु होती. केस गळतीमुळे अनेकांना टक्कल पडण्याची समस्यांचा सामना करावा लागतो. केस गळती होऊ नये म्हणून काय करावे जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात.

उन्हाळा आता सुरू झाला असून त्याच्या झळा सर्वांना बसत आहेत. तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. उन्हाळ्यातील गरमीने प्रत्येकजण त्रस्त असतो. उन्हाळ्यात अनेक शारीरिक आजार डोकेवर काढतात. बाहेर पडलात की ऊन तर लागतंच पण त्यासोबतच डिहायड्रेशन, पोटदुखी, मळमळ होणं, चक्कर येणं, त्वचेचे विकार हे आजार होतात. आता उन्हाळ्यामध्ये अनेकांना केसांची समस्या ही उद्भवू शकते. यामध्ये तेलकट टाळू, घाम आणि धूळ यामुळे कोंडा, खाज सुटणे आणि केस गळती याचा समावेश असतो. याची नेमकी कारणे काय? आणि कशा प्रकारची खबरदारी घ्यायला हवी, जाणून घ्या. आजच्या जीवनशैलीत केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. ज्यामुळे पुरूषांपासून महिलांपर्यंत...
