Tips to Manage Migraine at Work : मायग्रेनमुळे होतोय कामावर परिणाम? असा करा बचाव

भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Nov 02, 2022 | 4:01 PM

कामात व्यस्त असताना मायग्रेनचा त्रास होत असल्यास काही उपायांनी ही डोकेदुखी थांबवता येऊ शकते. त्यासह मेडिटेशन व ताण नियंत्रित करणे हेही उपयुक्त ठरू शकते.

Tips to Manage Migraine at Work : मायग्रेनमुळे होतोय कामावर परिणाम? असा करा बचाव

नवी दिल्ली – मायग्रेन (तीव्र डोकेदुखी) (migraine) ही आजकाल खूप सामान्य समस्या बनली आहे, जी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस प्रभावित करू शकते. यामध्ये डोक्याच्या अर्ध्या भागात तीव्र वेदना (pain) होतात, ज्या कधी तासनतास त्रास देऊ शकतात. मासिक पाळी किंवा हार्मोनल बदलांसारख्या सामान्य गोष्टींमुळेदेखील ही समस्या उद्भवू शकते. बऱ्याच वेळेस काही सोप्या घरगुती उपयांनी मायग्रेनचा सामना करता येऊ शकतो. मात्र ऑफीसमध्ये (office work) काम करताना हा त्रास सुरू झाल्यास परिस्थिती आणखी बिघडते. वेदनांमुळे काहीही काम करणे शक्य होत नाही व त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवरही होतो.

एखादा विद्यार्थी असो वा गृहिणी किंवा जॉब करणारी व्यक्ती, कामात असताना मायग्रेनचा ॲटॅक आल्यास कोणाचेही काम ठप्प होते. कामावर असताना मायग्रेनचा त्रास सुरू झाल्यास काही महत्त्वपूर्ण उपायांनी हा त्रास रोखण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. काही टिप्स जाणून घेऊया.

काम करत असताना मायग्रेनचा ॲटॅक कसा रोखावा ?

तणाव मॅनेज करा
हेल्थलाइन डॉट कॉम नुसार, तणावामुळे मायग्रेनची समस्या वाढू शकते. म्हणूनच मन शांत करावे आणि मेंदूतून कामाच्या ओझ्याचा ताण दूर करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी काम करताना काही काळ थांबून मेडिटेशन करता येऊ शकते. छोट्या छोट्या कामांमध्ये कामाची विभागणी करावी, सहकाऱ्यांकडून मदत घ्यावी. तसेच तुमचे डॉक्टर किंवा थेरपीस्ट यांचीही तणावाचा सामना करण्यासाठी मदत घेता येईल.

वेदना वाढवणारे घटक रोखावेत
कधीकधी मोठा आवाज, तीव्र प्रकाश किंवा तीव्र वास यामुळेदेखील मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. कामादरम्यान मायग्रेनचा त्रास होतो, तेव्हा ज्यामुळे डोळे, कान किंवा मेंदूला त्रास होत असेल, त्या गोष्टी थांबवा किंवा नियंत्रित करा. असे केल्याने तुम्हाला वेदनेपासून लवकर आराम मिळू शकेल.

कामातून ब्रेक घ्या
मायग्रेनचा त्रास सुरू झाल्यास काम करत राहू नका. थोडा वेळ ब्रेक घ्या, स्वत:साठी वेळ काढा. वेदना कमी झाल्यावर काम पुन्हा सुरू करावे.

हे सुद्धा वाचा

वेदनेचा सामना करण्यासाठी तयार रहा
मायग्रेनचा त्रास वारंवार होत असेल तर त्यावरील औषधं आणि कोल्ड पॅक्स असे उपचार नेहमी तयार ठेवा. आपल्या सहका-यांना आपल्या या समस्येबद्दल माहिती द्या, जेणेकरून गरज पडल्यास त्यांची मदत घेता येऊ शकेल.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI