Health : अपुऱ्या झोपेमुळे वाढतो हृदयावरील ताण आणि रक्तवाहिन्याही होतात खराब, शांत झोपेसाठी या टिप्स करा फॉलो

अपुरी झोप ही तुमच्या संपुर्ण आरोग्यावर परिणाम करू शकते. जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही तेव्हा रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयावरील ताण वाढते आणि रक्तवाहिन्या खराब होण्याचा धोका उद्भवतो. चांगली आणि शांत झोप अनुभवण्यासाठी खास टिप्स फॉलो करा.

Health : अपुऱ्या झोपेमुळे वाढतो हृदयावरील ताण आणि रक्तवाहिन्याही होतात खराब, शांत झोपेसाठी या टिप्स करा फॉलो
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 3:47 PM

मुंबई : निरोगी हृदय राखण्यासाठी रात्रीच्या वेळी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. अपुरी किंवा खराब-गुणवत्तेची झोप उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराशी संबंधित आहे. दुर्दैवाने, बर्‍याच लोकांना पुरेशी झोप मिळत नाही आणि बहुतेक लोकांना दिवसा झोप येते. किमान 8 तास शांत झोप घेणे ही काळाची गरज आहे. परंतु अनेकजण त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे फक्त 5-6 तासच झोपतात. मात्र, संपूर्ण आरोग्य निरोगी राहण्यासाठी झोपेच्या चांगल्या सवयी बाळगणे गरजेचे आहे. याबाबत फिजिशियन, डायबेटोलॉजिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. सचिन नलावडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

स्लीप एपनिया हृदयावर अशा प्रकारे परिणाम करते: ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) हा झोपेचा एक प्रचलित विकार आहे जो झोप आणि हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण धोका निर्माण करतो. असे घडते जेव्हा घशाच्या मागील बाजूचे स्नायू जास्त प्रमाणात शिथिल होतात, ज्यामुळे वायुमार्ग संकुचित होतो आणि झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवासात वारंवार व्यत्यय येतो. ओएसए हे फुफ्फुसाच्या उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरू शकते. फुफ्फुसाच्या धमन्या आणि हृदयाच्या उजव्या बाजूला प्रभावित करणारा उच्च रक्तदाबाचा एक प्रकार तसेच हार्ट फेल्युअरला कारणीभूत ठरू शकतो.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयाचे कार्य कसे बदलते यासह शरीरातील प्रत्येक अवयवावर याचा परिणाम होत असतो. हृदय आणि फुफ्फुसे दोन्ही छातीच्या पोकळीतील जागा व्यापत असल्याने, फुफ्फुसाच्या कार्यावर ताण येऊन हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. या शारीरिक ताणामुळे हृदयाचे स्नायू घट्ट होऊ शकतात आणि संपूर्ण हृदयाचे कार्यात बिघड निर्माण होऊ शकतो तसेच उच्च रक्तदाब आणि हृदयाची गती वाढू शकते. स्लीप अ‍ॅपनिया हा दिवसभराचा थकवा, मोठ्याने घोरणे आणि श्वास गुदमरल्यासारखे आवाज येणे, सकाळच्या वेळी डोकेदुखी, उठल्यावर तोंड कोरडे पडणे आणि शांत झोप न लागणे यासारख्या समस्या दिसू शकतात. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) विकसित होण्याचा धोका वयानुसार वाढतो.

चांगली आणि शांत झोप अनुभवण्यासाठी खास टिप्स

रात्रीच्या शांत झोपेची तयारी ही झोपेच्या आधीपासूनच सुरू होते. दिवसा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येण्यामुळे तुमच्या शरीराला दिवसाची वेळ असल्याचे संकेत मिळतो, ज्यामुळे झोपेची गती वाढते आणि मेलाटोनिन, स्लीप हार्मोनचे उत्पादन सुरू होते.

जेव्हा शक्य असेल तेव्हा दुपारनंतर कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा कारण त्याचे परिणाम रात्रीपर्यंत टिकून राहतात.

झोपण्यासाठी पुरेसा काळोख आणि थंड वातावरण निर्मिती करा आणि रात्री उशिरापर्यंत उत्तेजक क्रियांपासून दूर राहा. जसे की व्यायाम किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर.

सौम्य संगीत ऐका, गरम पाण्याने आंघोळ करा किंवा टिव्ही पाहण्याऐवजी झोपण्यापूर्वी वाचन करा. झोपण्यापूर्वी पाणी पिणे टाळा कारण तुम्हाला सतत लघवीसाठी उठावे लागेल आणि तुम्हाला शांत झोप घेती येणार नाही.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.