AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवणे योग्य की अयोग्य? तज्ञांकडून जाणून घ्या

लसूण दररोज स्वयंपाकघरात वापरला जातो, परंतु ते सोलणे हे एक त्रासदायक काम आहे. वेळ वाचवण्यासाठी, बरेच लोक लसूण आधीच सोलून ठेवतात आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात, जेणेकरून जेव्हा गरज असेल तेव्हा त्याचा थेट वापर करता येईल. पण ही पद्धत खरोखरच योग्य आहे की लसणाच्या गुणवत्तेवर आणि आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो का? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून याचे उत्तर.

लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवणे योग्य की अयोग्य? तज्ञांकडून जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Feb 20, 2025 | 2:48 PM
Share

लसूण हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे प्रत्येक स्वयंपाकघरात वापरला जाणारा लसूण हा अत्यावश्यक पदार्थ आहे. अशातच वेळ वाचवण्यासाठी व सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत अनेक महिला लसूण आधीच सोलून फ्रिजमध्ये ठेवतात, पण लसूण सोलून साठवून ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पण ही पद्धत योग्य आहे का? याबाबत अनेकांचा प्रचंड गोंधळ उडतो. सोलून ठेवलेले लसूण फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे की नाही आणि ते साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता असू शकतो हे आपण आहारतज्ञ डॉ मेधवी गौतम यांच्याकडून जाणून घेऊया.

सोलून ठेवलेले लसूण फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर याचे उत्तर थोडे मिळतं जुळतं आहे. डॉ.मेधवी गौतम यांनी सांगितले की, तुम्ही लसूण सोलून साठवून ठेवू शकता, परंतु काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. लसणात नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो, परंतु जेव्हा ते सोलून ठेवले जाते तेव्हा ते लवकर खराब होते आणि त्यात बुरशी किंवा बॅक्टेरिया वाढण्याचा धोका देखील वाढतो. विशेषत: जर ते योग्यरित्या साठवले गेले नाही तर, ओलाव्याने लसुन लवकर खराब होण्याची शक्यता आहे.

सोलून ठेवलेले लसूण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याचे नुकसान

लसणाची मूळ चव आणि त्याचा तीव्र सुगंध हळूहळू कमी होऊ लागतो.

सोलून ठेवलेल्या लसूणमध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढू शकतात, विशेषत: तुम्ही हवाबंद डब्यात ठेवले नाही तर.

रेफ्रिजरेटरमध्ये जास्त ओलावा असल्यास, लसूण मऊ होऊन खराब होऊ लागतो आणि त्यात हिरवी किंवा काळी बुरशी लागु शकते.

सोललेला लसूण फ्रिजमध्ये जास्त काळ ठेवल्यास त्यात क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनमसारखे जीवाणू वाढू शकतात, ज्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते.

लसूण सोलून साठवायचे असेल तर योग्य मार्ग कोणता आहे?

जर तुम्हाला खरोखर वेळेची बचत करायची आहे आणि सोलून ठेवलेले लसूण साठवायचे असल्यास या काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:

हवाबंद डब्यात किंवा झिप लॉक बॅगमध्ये लसून साठवून ठेवल्यास यामध्ये ओलावा आणि हवा आत जाण्यापासून प्रतिबंधित होते. त्यामुळे लसूण जास्त काळ ताजे ठेवता येतात. जर तुम्ही सोललेला लसूण हवाबंद डब्यात किंवा झिप लॉक बॅगमध्ये ठेवत असाल तर त्याची शेल्फ लाइफ फक्त 7 ते 10 दिवस आहे. या कालावधीत तुम्हाला ते वापरावे लागेल.

सोललेले लसूण साठवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे ते ऑलिव्ह ऑईल किंवा कोणत्याही खाद्यतेलात बुडवून ठेवणे. हे केवळ त्याची चव टिकवून ठेवणार नाही, शिवाय ते जास्त काळ खराब होत नाही.

जर तुम्हाला सोललेले लसूण जास्त काळ साठवायचे असेल तर सोललेल्या लसणाची पेस्ट बनवा आणि फ्रीजरमध्ये ठेवा. ही पद्धत सर्वात सोपी आहे.

लसूण सोलून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे पूर्णपणे चुकीचे नाही, परंतु ते योग्यरित्या साठवणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही सोललेले लसूण असेच पॅक न करता ठेवल्यास लवकर खराब होऊ शकते आणि आरोग्यासाठी हानीकारक देखील ठरू शकते. म्हणून, जर तुम्हाला सोललेला लसूण साठवायचा असेल तर ते पेस्टच्या स्वरूपात हवाबंद डब्यात, किंवा तेलात बुडवून फ्रीजरमध्ये ठेवणे चांगले.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.