Weight Loss Fruits : हिवाळ्यात वाढत्या वजनामुळे त्रास होत असाल तर ही 6 फळे खा
हिवाळ्यात जर तुमचं वजन वेगाने वाढत असेल तर तुम्ही आहारात काही फळांचा समावेश करू शकता. या फळांमुळे वजन जलद कमी करण्यास मदत होईल.

नवी दिल्ली – वजन…. प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आजकाल हे वजन. ते वाढलं तरी प्रॉब्लेम, कमी झालं तरी प्रॉब्लेम… ! एकवेळ कमी वजन वाढवणं सोपं आहे, पण वजन कमी करणं (weight loss) ही काही खायची गोष्ट नाहीये. वजन कमी करण्याचा प्रवास सोपा नसतो, त्यासाठी योग्य आणि वेळवर आहार घेणे आणि मुख्य म्हणजे नियमितपणे व्यायाम करणे (exercise) अतिशय महत्वाचे आहे. हिवाळ्याच्या ऋतूत 4 घास जरा जास्तच खाल्ले जातात, थंड वातावरणात गरम जेवणाची मजा वेगळीच असते. हिवाळ्यात वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही काही फळांचाही आहारात समावेश करू शकता. ही फळे जलद वजन कमी (eat fruits for weight loss) करण्यास मदत करतील. ही फळे पोषक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांचा खजिना आहेत. त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होईल.
आपण कोणत्या फळांचा आहारात समावेश करू शकतो, ते जाणून घेऊया.
संत्रं
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे शरीर डिटॉक्स करण्याचे काम करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यात कॅलरीज कमी प्रमाणात असतात. त्यात पोटॅशिअम आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. संत्रं खाल्याने पोट दीर्घकाळ भरलेले वाटते.
सीताफळ
सीताफळ हे जीवनसत्त्वं आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे. त्यात व्हिटॅमिन ए आणि सी असते. तसेच लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि तांबे असते. सीताफळामध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते.
डाळिंब
डाळिंबामध्ये कॅलरीज कमी असतात. त्यात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. तसेच खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. व्यायामापूर्वी आणि नंतरच्या काळात तुम्ही या डाळिंबाचे सेवन करू शकता. हे ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करते. ही एक प्रकारची चरबी असते.
स्टारफ्रूट
स्टारफ्रूटमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. डाएटिंग करणाऱ्यांनी त्याचा आहारात समावेश करावा. त्यात फायबर असते. हे चयापचय अर्थात मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करते. स्टारफ्रूट खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. स्टारफ्रूटच्या सेवनाने पचनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे सूज येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच पचनसंस्था निरोगी राहते.
पेरू
पेरूचे सेवन हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात केले जाते. हे फळ अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट असते. त्यामध्ये प्रोटीन आणि फायबर असते. पेरू खाल्ल्याने तुमचं पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. हे फळ जलद वजन कमी करण्यास देखील मदत करते.
