‘हे’ सुंदर फूल केवळ सजावटीसाठी नाही तर आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे
आयुर्वेदात अशी काही फुलं आहेत ज्याची बिया, पाने आणि तेल शतकानुशतके शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जात आहेत. जितके हे फुल दिसायला सुंदर आहे तितकेच ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की नेमकी हे फुल आहेतरी कोणतं? आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे.

आपल्या आसपास अशी अनेक फुले आहेत जी दिसायला खूप सुंदर आणि सुगंधित आहेत. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या आवडीनुसार घराच्या भोवती लावता आणि ती फुलं तुमच्या घराचे सौंदर्य वाढवतात. अशातच असे एक फूल आहे जे तुमच्या घराचे सौंदर्य वाढवण्याबरोबरच तर तुमचे आरोग्य तंदुरस्त राखण्यासाठी खुप ओळखले जाते. आपण सूर्यफुलाबद्दल बोलत आहोत. हे फूल केवळ बागेपुरतेच मर्यादित नाही तर घराचे सौंदर्य वाढवण्या सोबत आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्यात औषधी गुणधर्म देखील आहेत जे अनेक आरोग्य फायदे प्रदान करतात. चला तर मग आजच्या लेखात आपण सूर्यफुलाचे फायदे जाणून घेऊया.
सूर्यफूलाचे फायदे
-आयुर्वेदात सूर्यफुलाला खूप महत्व आहे. या फुलाचे बिया, पाने आणि तेल शतकानुशतके शारीरिक आणि मानसिक समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जात आहेत.
सूर्यफूल फुलांमध्ये ट्रायटरपीन ग्लायकोसाइड्स नावाचे संयुगे भरपूर प्रमाणात असतात, जे बॅक्टेरियाशी लढण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतात. ते अँटीऑक्सिडंट्समध्ये देखील समृद्ध असतात, जे हृदय आणि थायरॉईडच्या आरोग्यास समर्थन देतात. म्हणून या फुलाचे तेल आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतात.
-औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या सूर्यफुलांचे सेवन केल्याने सांधेदुखी, संधिवात आणि शरीराच्या जडपणापासून आराम मिळतो.
जर तुम्हाला सतत बद्धकोष्ठता, पोटफुगी, गॅस आणि जंतांच्या समस्या असतील तर या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी सूर्यफुलांचा वापर करता येतो. यामुळे पचनसंस्था मजबूत होते. सूर्यफुलाचे तेल, मलम किंवा बियांचे सेवन केल्याने फोड, खाज आणि त्वचेच्या आजारांवर फायदेशीर ठरते.
आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, जर तुम्हाला ताप असेल तर तुम्ही सूर्यफुलाच्या पानांपासून बनवलेला काढा किंवा चहा घेऊ शकता. सूर्यफुलाची फुले हृदय आणि थायरॉईडसाठी देखील चांगली असतात. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने हे फुल हृदयरोगापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये ओमेगा-6 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही तुमच्या जेवणात सूर्यफूल तेल वापरा. कारण हे तेल शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. तथापि ते सेवन करण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
