वजन कमी करण्यासोठी सोपी ट्रिक, ‘हे’ पेय दररोज सकाळी प्याल, तर…
वजन वाढल्याने अनेक शारीरिक समस्या (Problem) निर्माण होतात. यामुळे सर्वांत मोठी समस्या म्हणजे पोटावर चरबी जमा होते. पण, आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या या घटकांमुळे केवळ एका महिन्यात आश्चर्यकारक बदल घडवून आणता येतात.

सध्याच्या जीवनशैलीत (Lifestyle) वाढलेल्या वजनाची अनेकांना मोठी चिंता आहे. कारण वाढलेल्या वजनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. मधुमेह, कोलेस्टेरॉल, युरिक ऍसिड यांसारख्या समस्यांना लठ्ठपणामुळेच होतात. अनेकदा ताणामुळे वजन वाढते. अशात काही जण अनेक वेळ उपाशी राहतात, डाएट फॉलो करतात. पण यामुळे त्रास होण्याच्या शक्यता अधिक असतात. तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या या घटकांमुळे केवळ एका महिन्यात आश्चर्यकारक बदल घडवून आणता येतात. त्या पदार्थांचं नाव आहे, लिंबाचा रस आणि मध…
लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रण शरीराच्या तापमानावर किंचित परिणाम करते आणि चयापचय क्रिया गतिमान करते. यामुळे तुमचे शरीर विश्रांती घेत असतानाही अधिक कॅलरीज बर्न करते. लिंबामध्ये असलेले पेक्टिन नावाचे फायबर केवळ भूकच नियंत्रित करत नाही, तर शरीरात साठलेल्या चरबीच्या पेशींचे विघटन करण्यासही मदत करते. हे पेय यकृताला रात्रभर शरीरात साचलेला कचरा आणि विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते.
या सवयीमुळे केवळ वजन कमी होण्यास मदत होत नाही, तर त्याचे इतरही आरोग्यदायी फायदे आहेत. लिंबामधील व्हिटॅमिन सी आणि मधातील जिवाणूनाशक गुणधर्म रक्त शुद्ध करतात. यामुळे मुरुमे कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शौचास साफ होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला रोगांशी लढण्याची शक्ती देतात.
बरेच लोक लिंबाचा रस घालून गरम पाणी पितात, पण ते चुकीचे आहे. पाणी कोमट ठेवावे. ते जास्त गरम झाल्यास मधातील औषधी गुणधर्म नष्ट होतात. शक्यतोवर शुद्ध, भेसळरहित सेंद्रिय मधाचाच वापर करा. साखर घातलेला मध फायदेशीर ठरणार नाही. अर्ध्या लिंबाचा रस पुरेसा आहे. जास्त वापरल्यास दातांना परिणाम होऊ शकतो.
फक्त हे पेय पिऊन बसून राहिल्याने तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. यासोबतच, तुम्ही ३० मिनिटे चालणे, जिम किंवा योगा केला पाहिजे. जंक फूड आणि गोड पदार्थ कमी करा आणि फळे व भाज्यांना प्राधान्य द्या. दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया स्थिर राहते.
लिंबाच्या रसातील आम्लतेमुळे दात संवेदनशील होऊ शकतात. तो प्यायल्यानंतर साध्या पाण्याने गुळण्या करण्याचा सल्ला दिला जातो. अल्सर किंवा तीव्र आम्लपित्ताचा त्रास असलेल्या लोकांनी रिकाम्या पोटी लिंबाचा रस घेऊ नये. मधामध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे, मधुमेहींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याचे सेवन करावे.
