AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांनो पेनकिलर्सच्या नेहमी सेवनाने उद्भवू शकतील कानाच्या समस्या, वेळीच व्हा सावधान!

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जर आपण पेन-किलर्स सेवन करत असू तर हे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.70 हजार महिलांवर केले गेलेल्या संशोधनानुसार पेनकिलर नियमितपणे सेवन केल्याने महिलांना कानाच्या संबंधित असलेल्या अनेक समस्या उद्भवतात ,असे समोर आले आहे.

महिलांनो पेनकिलर्सच्या नेहमी सेवनाने उद्भवू शकतील कानाच्या समस्या, वेळीच व्हा सावधान!
कानाशी निगडीत ही काही लक्षणे जाणवताच चुकूनही करू नका दुर्लक्ष
| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 12:24 PM
Share

मुंबई : बॉडी पेन(Body pain) म्हणजे अंगदुखी पासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण पेन किलर सेवन करत असतात.तुम्ही अनेकदा पाहिले सुद्धा असेल की जर तुमच्या हाता पायाला वेदना होत असतील, मांस पेशी दुखत असतील तर प्रत्येक जण तुम्हाला पेन किलर खाण्याचा सल्ला देत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का? जर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही पेन किलरचे ( pain keeler) सेवन केले तर त्याचा भविष्यात आपल्याला विपरीत परिणाम भोगायला लागू शकतो. अनेकदा शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होताना दिसतो. 70 हजार महिलांवर नुकत्याच केलेल्या एका अभ्यासा अंतर्गत एक गोष्ट समोर आलेली आहे की, जर महिला पेनकिलर चे नियमितपणे सेवन करतात तर त्यांना कानाशी निगडीत असलेल्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.अमेरिकेच्या बर्मिंघम एंड वूमेंस हॉस्पिटल येथील संशोधकांद्वारे करण्यात आलेल्या संशोधन अभ्यासअंतर्गत नियमितपणे कोणताही सल्ला न घेता पेन किलर सेवन करणाऱ्या महिलांमध्ये टिनिटस (कानाची समस्या) ची संभावना सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत 20 टक्के अधिक असते. या अभ्यासाचे प्रमुख डॉ.शेरॉन करहन यांनी सांगितले की, आम्ही केलेल्या अभ्यासाअंतर्गत पेनकिलर औषधांचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये टिनिटसचा धोका (ear problem) जास्त असतो. हे केले गेलेले संशोधन पेपर जर्नल ऑफ जनरल इंटरनल मेडिसिन मध्ये प्रकाशित झाला आहे.

या संशोधनात एडविल आणि टायलेनॉल सारख्या पेनकिलर्स शिवाय NSAIDs आणि Aleve सारखे एंटी-इनफ्लेमेटरी ड्रग्स यांचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार आठवड्यातून जर आपण 6 ते 7 वेळा ऍस्पिरिनचे डोस सेवन करत असू, अशा वेळीसुद्धा टिनिटसचा धोका 20% ने वाढतो. एक्सपर्ट यांच्या मते ,जर आपल्याला जास्त वेदना होत असतील तर अशा वेळी औषधे खाल्ल्याने टिनिटस लक्षणे कमी होतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

त्याचबरोबर या अभ्यासामध्ये अशा कोणत्याच प्रकारचा दावा करण्यात आला नाही की,ज्यात सर्दीवर किंवा दात दुखी सारखे त्रासांवर पॅरासिटामोल सारखे औषधे सेवन करू शकत नाही परंतु हा अभ्यास फक्त पेन किलर नियमितपणे सेवन करण्याच्या वापराबद्दलच आपल्याला सांगत आहे. पेनकिलर चा नियमित वापर केल्यास कोणतीही समस्या होत नाही. वर्ष 2018 मध्ये ब्रिटिश टिनिटस एसोसिएशन नुसार युकेमध्ये 60 लाख लोक कानाशी निगडीत असलेल्या समस्येचे शिकार झाले आहेत. ब्रिटनमध्ये अंदाजे 10 टक्के लोकसंख्या कानाशी निगडित असलेल्या समस्यांशी लढत आहे.

टिनिटस म्हणजे काय?

टिनिटस ही कानाशी निगडीत असलेली एक समस्या आहे. कानात रिंगिंग, बजिंग, हमिंग, थ्रॉबिंग या वेगवेगळया प्रकारचे आवाज ऐकू येणे याला टिनिटस म्हंटले जाते. कानात अश्या प्रकारचा आवाज नेहमी घुमत नसतो तर हा आवाज थोड्या थोड्या वेळाने जाणवत असतो. वयाच्या विशिष्ट टप्प्यावर हा आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो आणि म्हणूनच अशा वेळी आपल्याला पेन किलर्स सेवन करताना विशिष्ट काळजी सुद्धा घेणे गरजेचे आहे.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या :

झोपेतून जागे होताच मोबाईल वापरण्याची सवय? भविष्यात गंभीर आजारांना देताय निमंत्रण!

डायबिटीसआधी शरीरात दिसतात महत्त्वाची लक्षणं! ती लक्षणं ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष नको

दमा रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ ठरतात धोकादायक, आजच बदला आपला डाएट

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.