AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखर पूर्णपणे सोडणे शहाणपणाचे नाही, ‘हे’ दुष्परिणाम होऊ शकतात!

अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की जे लोक अचानक साखर सोडतात त्यांच्या शरीरात तेवढाच परिणाम होतो जेवढा एखादं व्यसन सोडणाऱ्या व्यक्तीवर होतो. यामुळे तुम्हाला लवकर थकवा येईल, डोकेदुखीची, चिडचिडेपणा येईल.

साखर पूर्णपणे सोडणे शहाणपणाचे नाही, 'हे' दुष्परिणाम होऊ शकतात!
Sugar intake
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 13, 2023 | 3:19 PM
Share

मुंबई: भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या इतकी जास्त आहे की या आजाराबद्दल भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे. मधुमेहाच्या रुग्णांना साखर आणि गोड पदार्थ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांना हा आजार टाळायचा आहे ते साखरेपासून स्वत:ला दूर ठेवू लागतात, पण साखर पूर्णपणे सोडणे योग्य नाही, त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. असे पाऊल उचलल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात हे जाणून घेऊया.

साखरेचे दोन प्रकार आहेत, एक नैसर्गिक आणि दुसरा प्रक्रिया केलेली साखर. आंबा, अननस, लिची, नारळ या फळांपासून नैसर्गिक साखर मिळते, परंतु प्रक्रिया केलेली साखर ऊस आणि बीटरूटपासून तयार केली जाते. साखर नियंत्रणात ठेवणे हा योग्य निर्णय आहे, परंतु तो पूर्णपणे सोडणे योग्य मानले जात नाही.

ऊस आणि गोड बीटरूटपासून प्रक्रिया केलेल्या सुक्रोजमध्ये कॅलरी जास्त असतात, जरी त्याचे कोणतेही पौष्टिक मूल्य नसले तरी नैसर्गिक साखरेमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. गोड पदार्थांची चव आपल्या सर्वांना आकर्षित करते, त्यामुळे ती पूर्णपणे सोडून देणे हा सोपा निर्णय नाही, परंतु जर आपण ते दैनंदिन आहारातून काढून टाकले तर आपल्याला नुकसान देखील सहन करावे लागू शकते.

अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की जे लोक अचानक साखर सोडतात त्यांच्या शरीरात तेवढाच परिणाम होतो जेवढा एखादं व्यसन सोडणाऱ्या व्यक्तीवर होतो. यामुळे तुम्हाला लवकर थकवा येईल, डोकेदुखीची, चिडचिडेपणा येईल.

साखर सोडण्याचा परिणाम आपल्या शरीरावर हळूहळू होईल. हा ऊर्जेचा स्त्रोत असल्याने त्यापासून स्वत:ला दूर ठेवताना आळसाचं प्रमाण वाढेल. साखर सोडली की शरीरातून अतिरिक्त इन्सुलिन कमी होऊ लागते. जरी आपण प्रक्रिया केलेली साखर खाणे थांबवले तरी गोड फळांचे सेवन सुरू ठेवा, जे आपल्याला नैसर्गिक साखर देईल आणि शरीरात उर्जा ठेवेल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.