महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी 5 लाखांहून अधिक लसीकरण, लवकरच दीड कोटींचा टप्पा गाठणार

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे.


मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद केलीय. सोमवारी (26 एप्रिल) सायंकाळी 6 वाजेपर्यंत 5 लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते. 3 एप्रिल रोजी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आज राज्याने लसीकरणात 5 लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे अभिनंदन केले आहे (Record break Corona vaccination in Maharashtra on 26 April 2021).

लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी

लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 42 हजार 716 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात आजची संख्या मिळवली तर सुमारे 1 कोटी 48 लाखांच्या आसपास ही संख्या होत आहे. उद्याच्या लसीकरणांनंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

महाराष्ट्र गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने पुढे

गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र पुढे आहे. 26 एप्रिल रोजी राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 6155 लसीकरण केंद्र होते. त्यामध्ये 5347 शासकीय आणि 808 खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

पहिल्या दिवसापासून लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड

अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला 8 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. राज्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी 3 लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाआधीच मोफत लसीकरणाचं श्रेय घेणं चुकीचं, बाळासाहेब थोरातांची शिवसेना-राष्ट्रवादीवर टीका

अभी ज़रा बाज़ आएँ।, संजय निरुपमांनी राष्ट्रवादीला फटकारले; मोफत लसीकरणाच्या श्रेयावरून जुंपली

टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांनी आता आदित्य ठाकरेंना डिवचले

व्हिडीओ पाहा :

Record break Corona vaccination in Maharashtra on 26 April 2021

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI