‘या’ लोकांनी गरम पाणी पिणे टाळावे; तब्येतीत होऊ शकतो आणखीन बिघाड

गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते, पचनशक्ती वाढते, अस्वस्थता कमी करते. या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी बहुतेक लोकं गरम पाण्याचे सेवन करतात, विशेषत: हिवाळ्यात. पण जास्त प्रमाणात गरम पाणी पिणे आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते.

'या' लोकांनी गरम पाणी पिणे टाळावे; तब्येतीत होऊ शकतो आणखीन बिघाड
hot water Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 11:48 AM

बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप असे व्हायरल आजार होत असतात. त्यामुळे तब्येतीची विशेष काळजी आपण घेत असतो. वातावरणाच्या बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून दूर राहण्याकरिता आपण सर्वजण घरगुती उपाय करत असतो. त्यातच अनेकजण बदलत्या ऋतूत सर्दी, खोकला असे आजार होऊ नये म्हणून सतत गरम पाणी पित असतात. गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते, पचनशक्ती वाढते, अस्वस्थता कमी होते. या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी बहुतेक लोकं गरम पाण्याचे सेवन करतात, विशेषत: हिवाळ्यात. पण जास्त प्रमाणात गरम पाणी पिणे आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. जास्त गरम पाणी प्यायल्याने कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ते जाणून घेऊ या.

– बदलत्या हवामानामुळे अनेकांना सर्दी-खोकला होत असतो. तुम्हाला जर सर्दी खोकला असेल तर तुम्ही गरम पाणी पिणे टाळावे. गरम पाणी जास्त प्यायल्याने तुमच्या घशाला सूज येऊ शकते. ज्यामुळे तब्येत बिघडू शकते. या दरम्यान तुम्ही हलके गरम पाणी प्यावे.

– तुमच्या घरातील लहान मुलांना सुद्धा जास्त प्रमाणात गरम पाणी पिण्यास देऊ नये. कारण लहान मुलांची पचनसंस्थाही अतिशय नाजूक असते ज्याचा परिणाम त्यांच्या पचनशक्तीवर होऊ शकतो.

-घरातील एखाद्या सदस्याला लिव्हरचा आजार असेल तर त्यांनी सुद्धा गरम पाणी जास्त प्रमाणात पिऊ नये. कारण याने त्याच्या लिव्हरवर अतिरिक्त ताण पडू शकतो. याशिवाय आरोग्याशी संबंधित इतर समस्या देखील उद्भवू शकतात.

– तुमच्या दातांना संवेदनशीलतेचा (सेन्सिटिव्हीटीचा) त्रास होत असेल तर तुम्ही गरम पाणी जास्त प्रमाणात पिऊ नका. कारण यामुळे तुमच्या दात अधिक सेन्सिटिव्हीटी होऊ शकतात.

– जर तुम्ही सतत गरम पाणी पित असाल तर तुमच्या अंतर्गत अवयवांना नुकसान पोहचू शकते . खासकरून ज्या लोकांना आधीच गॅस्ट्रिकची समस्या सतावत असते. त्या लोकांनी गरम पाणी पिणे नुकसानकारक आहे.

जर तुम्हाला देखील अश्याच काही समस्या असतील तर यापुढे या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमचे आरोग्य बिघडण्यापासून वाचवू शकता.

जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.