तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहेत अनेक आजारांवरील उपचार; जाणून घ्या ‘या’ पाच नैसर्गिक पेन किलर्स बद्दल

थोडासा जरी त्रास झाला किंवा काही दुखले तर अनेक जण लगेच पेन किलर गोळी (Pain killer pill) घेतात. त्यांना अशा गोळ्या घेण्याची सवयच असते. मात्र रोजच्या छोट्या-छोट्या समस्यांपासून आराम देणाऱ्या गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत. त्यामुळे शक्यतो पेन किलर गोळ्यांचे सेवन टाळावे. या नैसर्गिक पेन किलरमध्ये अनेक प्रकारच्या वेदना आणि इतस समस्या दूर करण्याची क्षमता असते.

तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहेत अनेक आजारांवरील उपचार; जाणून घ्या 'या' पाच नैसर्गिक पेन किलर्स बद्दल
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 6:15 AM

Natural pain killer :  थोडासा जरी त्रास झाला किंवा काही दुखले तर अनेक जण लगेच पेन किलर गोळी (Pain killer pill) घेतात. त्यांना अशा गोळ्या घेण्याची सवयच असते. मात्र मोठ्याप्रमाणात पेन किलर गोळ्या खाणे हे आरोग्यासाठी(Health) हानिकारक असते. जास्त प्रमाणात पेन किलर गोळ्या घेतल्यास त्याचा परिणामा हा तुमच्या किडनी आणि यकृतावर होऊ शकतो. त्यामुळे जर खूपच त्रास होत असेल तर पेन किलर गोळ्या घ्याव्यात. या पेन किलर गोळ्यांचे सेवन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावे. रोजच्या छोट्या-छोट्या समस्यांपासून आराम देणाऱ्या गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत. त्यामुळे शक्यतो पेन किलर गोळ्यांचे सेवन टाळावे. या नैसर्गिक पेन किलरमध्ये अनेक प्रकारच्या वेदना आणि इतस समस्या दूर करण्याची क्षमता असते. आपण आज अशाच काही नैसर्गिक पेन किलरबद्दल जाणून घेणार आहोत.

आले

डोकेदुखीचा त्रास होत असल्यास आले पाण्यात बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि कपाळावर लावा. आल्यामध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म असतात जे तुम्हाला दुखण्यापासून आराम देतात. याशिवाय आले वात दूर करते. पोटात गॅस तयार होत असेल तर, काळे मीठ टाकून खाल्ल्याने खूप आराम मिळतो. सर्दी, खोकल्यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठीही आले खूप फायदेशीर मानले जाते.

हळद

हळदीमध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे दुखापत झाल्यास किंवा सूज आल्यास मोहरीच्या तेलात कोमट हळद टाकून प्रभावित भागावर लावा. यामुळे वेदना आणि सूज कमी होते. दुधासोबत हळद घेतल्याने स्नायूंमधील अंतर्गत वेदना दूर होतात. याशिवाय सर्दी-खोकल्याच्या समस्येतही हळद आराम देते.

कांदा

कांद्याच्या रसामध्ये दाहक-विरोधी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. कांदा तव्यावर गरम केल्यानंतर त्याचा रस काढून सांध्यांवर लावल्याने दुखण्यापासून खूप आराम मिळतो. याशिवाय कांदा सूज आणि वेदना कमी करण्यासाठीही चांगले काम करतो.

लसूण

तुमच्या शरीराच्या जो भाग दुखत असेल तिथे लसणाच्या तेलाने मालिश कारावी. दुखण्यापासून आराम मिळतो. छातीत दुखणे किंवा जड होणे, गॅसची समस्या असल्यास लसणाच्या पाकळ्या पाण्यासोबत गिळल्याने फरक पडतो.

ओवा

पोटात गॅसची समस्या असेल किंवा पोटदुखीचा त्रास होत असेल तर ओवा खाल्ल्याने आराम मिळतो. याशिवाय मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासातही ओवा खाल्ल्यास फायदा होतो.

टिप – वरील सर्व माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारीत आहे, संबंधित माहितीच्या प्रामाणिकरणाची कोणतीही जबाबदारी टीव्ही 9 घेत नाही. वरील गोष्टी करून पाहाण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.

संबंधित बातम्या

घे भरारी: ‘डिप्रेशनचं’ चक्रव्यूव्ह यशस्वी भेदले, अवघं आकाश मोकळे जाहले!

Health | तुम्हाला ही झोपताना छातीशी उशी घेण्याची सवय? जाणून घ्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट!

Corona Cases India : देशात 2 लाख 68 हजार नवे कोरोना रुग्ण, वाढत्या मृत्यूच्या संख्येनं टेन्शन वाढलं

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.