AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे’ पदार्थ शरीरातील पाणी शोषतात, टाळा!

जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा लघवीचा रंग बदलतो आणि तुम्हाला थकवा आणि जीभ कोरडी पडल्याचं जाणवतं. त्यामुळे हे जाणून घेणं गरजेचं आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या शरीरातील पाणी शोषून घेण्याचं काम करतात. माहिती पडल्यास आपण या गोष्टींचे सेवन टाळू शकतो.

'हे' पदार्थ शरीरातील पाणी शोषतात, टाळा!
food absorb water
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 20, 2023 | 1:21 PM
Share

मुंबई: शरीरासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. कारण जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच, डॉक्टर नेहमीच आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात, तर हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी पिणे पुरेसे नसते. त्यामुळे आपण आपल्या जीवनशैली आणि आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर असे अनेक लोक असतात जे नकळत अशा गोष्टींचे सेवन करतात जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा लघवीचा रंग बदलतो आणि तुम्हाला थकवा आणि जीभ कोरडी पडल्याचं जाणवतं. त्यामुळे हे जाणून घेणं गरजेचं आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या शरीरातील पाणी शोषून घेण्याचं काम करतात. माहिती पडल्यास आपण या गोष्टींचे सेवन टाळू शकतो.

या गोष्टी शरीरातील पाणी शोषतात

कॉफी

बहुतेक लोकांना कॉफी पिण्याची इच्छा असते. काही लोक दिवसातून अनेकवेळा कॉफीचे सेवन करतात. पण तुम्हाला माहित आहे का की कॉफीमध्ये कॅफिन असते जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. होय, कॅफिनच्या अतिसेवनामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे तुमच्या शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे जास्त कॉफीचे सेवन करणे टाळा, अन्यथा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते.

ग्रीन टी

ग्रीन टी ला खूप चांगले आणि हेल्दी ड्रिंक म्हणतात. कारण यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीर निरोगी ठेवण्याचे काम करतात, परंतु आपल्याला माहित आहे का की हे आपल्या शरीराला डिहायड्रेट करण्याचे काम करते? त्यामुळे ग्रीन टीचे सेवन कमी केले पाहिजे. कारण ते आपल्या शरीरातील पाणी शोषून घेते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर.
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट.
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?.
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,.
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे.....
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे......
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या...
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या....
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण.
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत.
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं.
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम..
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम...