AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही गरजेपेक्षा जास्त मीठ खाताय का ? ही लक्षणे दिसत असतील तर वेळीच सावध व्हा..

मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही, हे मान्यच आहे. पण काही लोकं मीठ इतकं जास्त खातात, की त्यांच्या तब्येतीवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात.

तुम्ही गरजेपेक्षा जास्त मीठ खाताय का ? ही लक्षणे दिसत असतील तर वेळीच सावध व्हा..
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 20, 2023 | 1:43 PM
Share

नवी दिल्ली : गोड, कडू, तिखट, आंबट, तुरट आणि खारट…. या सहा मुख्य चवी (taste) त्यांचे प्रत्येकाचे पदार्थात आपापले महत्व आहे. त्यांचे प्रमाण थोडे जरी कमी जास्त झाले तर पदार्थांच्या चवीवर त्याचा थेट परिणाम होताना दिसतो. यापैकीच एक चव म्हणजे खारट, ज्यासाठी आपण मीठाचा (salt) वापर करतो. एखाद्या पदार्थात मीठाचे प्रमाण अगदी थोडेसे, चिमुटभरच लागते, पण त्याने संपूर्ण चव बदलते.

मीठाशिवाय आपण जेवणाची कल्पनाही करू शकत नाही. त्याशिवाय अन्नाला काही चव येत नाही, हेही मान्य. पण काही लोकं मीठ इतकं जास्त खातात, की त्यांच्या तब्येतीवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. प्रत्येक पदार्थ प्रमाणात खावा. तो कमी किंवा जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात. मीठाचेही तसेच आहे. मीठाचे अतिसेवन केल्यास शरीर काही संकेत दर्शवू लागते. तुम्हालाही असे संकेत दिसत असतील तर आजच सावध व्हा आणि मीठाचे अतिसेवन सोडा, नाहीतर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. ते संकेत कोणते, हे सविस्तर जाणून घेऊया…

हाय ब्लड प्रेशर

शरीरात सोडिअमचे प्रमाणत जास्त झाल्यास त्या व्यक्तीला हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना करावा लागतो. किडनीद्वारे ब्लड प्रेशरमध्ये हा बदल होताना दिसतो. खूप जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्यास किडनीला द्रव पदार्थांचे उत्सर्जन करणे कठीण होते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे मीठाचे अतिसेवन टाळावे.

हृदयविकार

मीठाचे अती सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी जेवणात मिठाचे प्रमाण संतुलित ठेवावे. तसेच जास्त खारट पदार्थ खाणे टाळावे.

ब्लोटिंग

मीठाचे सेवन हे शरीरासाठी हानिकारकच असते. जास्त मीठ खाल्याने तुम्हाला सूज येण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. ब ऱ्याच वेळेस असं होतं की जेवल्यानंतर शरीर फुगल्यासारखे वाटते किंवा शरीर जड होते. आपल्या किडनीमध्ये काही प्रमाणात सोडिअम हे असतेच. मात्र अती मीठ खाल्ल्याने जेव्हा शरीरात जास्त सोडिअम मिसळले जाते, तेव्हा भरपाई करण्यासाठी किडनीला जास्त पाणी साठवून ठेवावे लागते. जेव्हा शरीरात मिठाचे प्रमाण जास्त असते तेव्हा पाणी जास्त प्रमाणात जमा होते. याला वॉटर रिटेंशन किंवा फ्लूइड रिटेंशन असे म्हटले जाते.

घसा कोरडा पडणे

जास्त मीठयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने आपला घसा कोरडा पडू लागतो, ज्यामुळे आपल्याला वारंवार तहान लागते.

झोपेत अडथळा येणे

झोपण्यापूर्वी तुम्ही जर जास्त सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन केले असेल तर तुम्हाला लवकर झोप न येणे, नीट , शांत झोप न लागणे असा त्रास होऊ शकते. जेवणात जास्त मीठ खाल्याने अस्वस्थ वाटणे, रात्री वारंवार जाग येणे अशा समस्याही उद्भवू शकतात.

मळमळ

मीठाचे अतिसेवन, जास्त खारट पदार्थ सतत खाणे यामुळे पोटात असंतुलन निर्माण होऊ शकते. यामुळे तुम्हाला मळमळण्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. ही परिस्थिती उद्भवू नये किंवा असा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर जेवणातील मीठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. तसेच, तुमचे शरीर हायड्रेटेड रहावे यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणेही गरजेचे आहे.

या चांगल्या सवयींचा अवलंब केल्यामुळे तुमच्या शरीरावरील दुष्परिणाम, तसेच आजारी पडणे टाळता येऊ शकते.

Follow Us
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?