Covid-19: बापरे! संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना कोरोनाची लागण

Covid-19: बापरे! संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना कोरोनाची लागण
M Venkaiah Naidu

राजधानी दिल्लीतील कोरोना संसर्गाचा कहर काही थांबताना दिसत नाहीये. संसद भवानातील 875 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 23, 2022 | 6:18 PM

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील कोरोना संसर्गाचा कहर काही थांबताना दिसत नाहीये. संसद भवानातील 875 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची टेस्ट करून घेण्याचं आवाहन केलं आहे.

संसद भवनातील 875 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यसभा सचिवालयातील 271 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या शिवाय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. व्यंकय्या नायडू हे हैदराबादेत आहेत. कोव्हिड प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी त्यांनी स्वत:ला एक आठवड्यासाठी आयसोलेट केले आहे. काही दिवसांमध्ये जे लोक आपल्या संपर्कात आले त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घ्या. कोव्हिडची चाचणीही करून घ्या, असं नायडू यांनी म्हटलं आहे.

देशातील रुग्णसंख्या किती?

देशातील कोरोनाची रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून वाढू लागली आहे. गेल्या 24 तासात देशात 3,33,533 नवे रुग्ण आढळले आहेत. तर चोवीस तासात देशभरात कोरोनाने 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही कोरोनाची आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता 21,87, 205 झाली आहे. देशात आजही संक्रमण दर 5.57 टक्के आहे. मात्र रिकव्हरी रेट कमी होऊन 93.18 टक्के झाला आहे.

मृत्यू दर कमी

कोरोनाच्या शेवटच्या लाटेदरम्यान, 11 एप्रिल ते 1 मे या कालावधीत राजधानीत कोरोनामुळे एकूण 4,200 मृत्यू झाले. यावेळी दुसऱ्या लाटेत 27 डिसेंबर ते 21 जानेवारी या 20 दिवसांच्या कालावधीत एकूण 436 जणांना संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यानुसार दिल्लीत या लाटेत मागील लाटेच्या तुलनेत 3764 मृत्यू कमी झाले आहेत. मृत्यू कमी झाले आहेत. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही 75 टक्क्यांनी कमी झाले आहे. दुसऱ्या लाटेत, एप्रिलमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 90 हजारांहून अधिक होती. त्यापैकी सुमारे 11 हजार रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. तर यावेळी 90 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण असूनही केवळ 2100 रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी, जुनाट आजाराने ग्रस्त रुग्ण आणि वृद्ध लोकांची संख्या मोठी आहे.

कोरोनाच्या शेवटच्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडली होती. तोपर्यंत देशात फारसे लसीकरण झाले नव्हते, पण यावेळी लसीकरण पुरेसे होते. तसेच, यावेळी ओमिक्रॉन प्रकार डेल्टापेक्षा सौम्य होता. यामुळे रुग्ण गंभीर आजारी पडला नाही. यामुळेच या वेळी मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण मागील लाटेच्या तुलनेत कमी आहे. तरीही खबरदारी म्हणून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णवाढीचे आकडे पाहता केंद्र आणि राज्य सरकार लसीकरण मोहिमेवर भर देत आहे, पुन्हा शाळा सुरू केल्याने विद्यार्थ्यांच्या लसीकरणालाही वेग आला आहे.

संबंधित बातम्या:

मेड इन चायना लसीचा फुसका बार, खोटे आकडे दाखवणं चीनला महागात

कोव्हिड-19 मधून रिकव्हर होताय. अगोदर तुमचा ब्रश बदला आणि पुन्हा करोना संक्रमणापासून स्वतःला दूर ठेवा…

तुमच्या मुलीला दिली का ‘ही’ लस? लस द्या कॅन्सरपासून सुरक्षीत रहा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें