AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात लहान मूल असेल तर किती असावं ACचं तापमान ? एम्सच्या डॉक्टरांकडून घ्या जाणून

उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाल्याने प्रत्येक घरामध्ये एसी वापरण्यास सुरूवात झाली आहे. पण उन्हाळ्यात एसी वापरताना अनेक गोष्टीं लक्षात ठेवणे गरजेचे असते. विशेषत: जर तुमच्या घरात लहान मुल असेल तर तुमच्या घरातील एसीचे तापमान किती असावे याबद्दल डॉक्टरांनी सांगितले आहे ते जाणून घेऊयात...

घरात लहान मूल असेल तर किती असावं ACचं तापमान ? एम्सच्या डॉक्टरांकडून घ्या जाणून
घरात लहान मूल असेल तर किती असावं ACचं तापमान ?
| Edited By: | Updated on: Apr 08, 2025 | 3:20 PM
Share

उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे या कडक उकाड्या पासून थंडावा मिळावा यासाठी प्रत्येक घरांमध्ये एसी सुरू झाला आहे. कारण वाढत्या तापमानामुळे लोकं एसीचा वापर करत आहेत. पण या काळात अनेक गोष्टींची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. जर तुमच्या घरात 6 महिन्यांचे लहान मूल असेल तर विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण एसीची गार हवा लहान मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. जर तुमच्या घरात एवढं लहान मूल असेल तर एसीचे तापमान किती असावे? कोणत्या मुलांनी एसीमध्ये झोपू नये? याबद्दल एम्सच्या डॉक्टरांनी काय सांगितले आहे. ते जाणून घेऊयात…

एम्समधील बालरोग विभागाचे डॉ. राकेश कुमार सांगतात की, जर एखादे लहान मूल घरात असेल आणि तुम्ही एसी वापरत असाल तर अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. विशेषतः एसीचे तापमान खूप कमी ठेवू नये. कमी तापमानामुळे लहान मुलांना त्वचेची अ‍ॅलर्जी होऊ शकते. त्वचेत कोरडेपणाची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे लहान मुलांची त्वचा संवेदनशील असल्याने एसीच्या कमी तापमानात त्यांना त्वचेशी संबंधित समस्या होण्याचा धोका असतो. यामुळे मुलाच्या शरीरात हायड्रेशनची कमतरता देखील भासू शकते. ज्यामुळे नंतर मुलांना लूज मोशन होऊ शकते. अशा परिस्थितीत, मुलांना कोणतीही समस्या येऊ नये म्हणून एसीचे तापमान नियंत्रणात ठेवणे महत्वाचे आहे. जर मूल एसीजवळ झोपत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

एसीचे तापमान किती असावे?

डॉ. राकेश यांच्यानुसार 6 महिन्यांपर्यंतच्या मुलासाठी घरातील एसी तापमान कधीही 25 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नसावे. जर तापमान यापेक्षा कमी असेल तर मुलाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यामुळे मुलांमध्ये खोकला आणि सर्दी होऊ शकते. जर तुम्हाला दमा असेल तर त्याची लक्षणे आणखी तीव्र होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये न्यूमोनियाचा धोका देखील होण्याची शक्यता असते. हे देखील लक्षात ठेवा की जर मुलाला एसी चालू केल्यानंतर खोकला येत असेल तर तो ताबडतोब बंद करा. असे न केल्यास मुलाच्या खोकल्याचा त्रास वाढू शकतो.

जर मूल एसीमध्ये झोपत असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा

तज्ञांच्या म्हणण्यानुसार लहान मुलांना कधीही एसीच्या थेट संपर्कात येऊ देऊ नका. विशेषतः एसीमध्ये, मुलाचे डोके आणि पाय झाकलेले असले पाहिजेत. मुलाला थेट एसीच्या हवेच्या संपर्कात आणू नये. जर मुलाला दमा, न्यूमोनिया, ब्राँकायटिस आणि त्वचेची अ‍ॅलर्जी असेल तर त्या लहान मुलांना एसीमध्ये झोपवू नये. असे केल्याने त्याच्या समस्या वाढू शकतात. कारण एसीच्या हवेमुळे या सर्व आजारांची लक्षणे अधिक तीव्र होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.