AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॉयलेट सिटवर 10 मिनिटाहून जादा काळ बसणे का धोकादायक?, तज्ज्ञांचा सल्ला काय?

टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन सर्फींग करीत बसण्याची किंवा वर्तमान पत्र वाचत बसण्याची तुम्हाला सवय असेल तर सावधान रहायला हवे. कारण टॉयलेटमध्ये अधिक वेळ बसणे हे अत्यंत धोकादायक आहे.

टॉयलेट सिटवर 10 मिनिटाहून जादा काळ बसणे का धोकादायक?, तज्ज्ञांचा सल्ला काय?
toilet
| Updated on: Nov 13, 2024 | 7:24 PM
Share

अनेकदा आपण टॉयलेट करताना मोबाईल फोन किंवा वर्तमान पत्र चाळत असतो. अशा लोकांची संख्या वाढत आहे. परंतू तुमची ही सवय तुमच्या जीवासाठी धोकादायक आहे. कारण यामुळे तुम्हाला अनेक आजाराची सहज लागण होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते टॉयलेट सिटवर दहा मिनिटांहून अधिक काळ बसू नये, काय आहे या मागे कारण ते पाहूयात…

युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साऊथवेस्टर्न मेडिकल सेंटरचे कोलोरेक्टल सर्जन डॉ.लाई जू यांनी सांगितले की या सवयीमुळे तुम्हाला मुळव्याध आणि कमजोर पेल्विक मसल्सचा धोका वाढतो. अनेकदा रुग्ण माझ्याकडे तक्रार घेऊन येतात. तेव्हा मुख्य म्हणजे टॉयलेट सिटवर अधिक काळ ते बसत असतात. त्यामुळे टॉयलेट सिटवर जास्तवेळ बसू नये असे डॉ.लाई जू यांनी सांगितले.

लोकांनी टॉयलेट सिटवर 5 ते 10 मिनिटांहून अधिक काळ बसणे योग्य नाही. बराच काळ बसल्याने पेल्विक भागावर जादा दाब पडतो. त्यामुळे एनल मसल्स कमजोर होणे आणि पेल्विक फ्लोर डिसफंक्शन सारखे आजार होऊ शकतात असे स्टोनी ब्रुक मेडिसिनमध्ये मेडिसिनचे असिस्टंट प्रोफेसर आणि इफ्लेमेटरी बाऊल डिसिज सेंटरच्या डायरेक्टर डॉ. फराह मोंजूर यांनी सांगितले.

टॉयलेटची सिट ओव्हल शेपमध्ये असते त्याने आपला गुदद्वाराचा भाग आखडतो. आणि रेक्टम पोझिशन खूप खाली जाते. गुरुत्वाकर्षणामुळे हा शरीराचा भाग खाली खेचला जातो, त्यामुळे नसांवर दबाव येतो. हा एकतर्फी वॉल्व बनतो. त्यामुळे येथे रक्त खाली सरकते. ते पुन्हा वर जात नाही. त्यामुळे एनस आणि लोअर रेक्टम जवळील नसा आणि रक्तवाहिन्या मोठ्या होतात आणि त्या रक्ताने भरल्या जाऊन मुळव्याधाचा धोका वाढतो असे डॉ. लाई जू यांनी सांगितले.

वेळेचे भान रहात

जबरदस्तीने दाब वाढवल्याने मुळव्याधाचा धोका वाढतो. टॉयलेटमध्ये आपला फोन स्क्रोल करणाऱ्यांना वेळेचे भान रहात नाही आणि ते त्याच धोकादायक स्थिती मसल्सवर दाब देत बसतात. आजकाल टॉयलेटमध्ये जास्त वेळ घालविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आणि हे एनोरेक्टल ऑर्गन्स आणि पेल्विक फ्लोरसाठी खूपच अनारोग्यकारक आहे.

सवय मोडण्यासाठी काय करावे ?

टॉयलेटमध्ये जास्तवेळ जाऊ नये यासाठी आपण टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल फोन, मॅगझीन, वृत्तपत्र, पुस्तक आत घेऊन जाऊ नये असे सिटी ऑफ होप ऑरेंज काऊंटीचे डॉ.लांस उरामोदो यांनी सांगितले.आपल्याला तेथे जास्त वेळ बसायचे नाही हे ठरवूनच आत जायला हवे असे डॉ. फराह मोंजूर यांनी सांगितले.

शौचाला जाण्यापू्र्वी हे करा

तुम्हाला जर रोज बाऊल मुव्हमेंटमुळे त्रास होत असेल तर दहा मिनिटे चालावे. आणि हायड्रेटिंग आणि फायबर भरपूर असलेल्या अन्नपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा कारण फायबर भरपूर असलेले अन्न पचायला सोपे असते. आणि त्यामुळे गॅसेसचा त्रास देखील होत नाही असे डॉ.लाई जू यांनी सांगितले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.