AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

22300000 कोटी, ही आहे इंग्लंडच्या राजघराण्याची संपत्ती, एकटा बकिंघम पॅलेसच 39 हजार कोटींचा, जाणून घ्या आणखी किती?

फोर्ब्सच्या आकेडवारीनुसार ब्रिटनच्या राजघराण्यातील सर्वोच्च पदी म्हणजेच राजा किंवा राणी या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या नावे एकूण २८ अब्ज डॉलर्स म्हणजे २.२३ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. यात दोन प्रकारच्या संपत्ती आहेत. पहिली या परिवारात सर्वात वरच्या पदावर म्हणजे द क्राऊन, मुकुटाच्या नावे असलेली संपत्ती आणि दुसरी संपत्ती म्हणजे त्या पदावर बसलेल्या राजा किंवा राणीची असलेली वैयक्तिक संपत्ती

22300000 कोटी, ही आहे इंग्लंडच्या राजघराण्याची संपत्ती, एकटा बकिंघम पॅलेसच 39 हजार कोटींचा, जाणून घ्या आणखी किती?
इंग्लंडच्या राजघराण्याची संपत्ती Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Sep 09, 2022 | 5:44 PM
Share

लंडन – स्कॉटलंडच्या (Scotland)ल्मोरल कैसल (Balmoral Castle)या शाही किल्ल्यात महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth)यांनी शेवटचा श्वास घेतला. बाल्मोरल कैसल हा शाही किल्ला 50 हजार एकर परिसरात पसरलेला आहे. या किल्ल्याची किंमत आहे 1116 कोटी रुपये. या भव्य किल्ल्याची मालकीण होती महाराणी एलिझाबेथ द्वितीय.

हा किल्ला हे एक त्यांच्या शाही राजघराण्याच्या संपत्तीतील एक उदाहरण आहे. लंडनच्या या शाही राजघराण्याकडे असे अनेक महाल, किल्ले, बग्ग्या, घोडागाड्या आहेत, ज्यांची किंमत आणि त्या किमतीपुढचे शून्य मोजायलाच आपल्याला कित तरी वेळ लागू शकतो.

लंडनच्या शाही परिवाराकडे 2.23 लाख कोटी रुपयांची संपत्ती

फोर्ब्सच्या आकेडवारीनुसार ब्रिटनच्या राजघराण्यातील सर्वोच्च पदी म्हणजेच राजा किंवा राणी या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या नावे एकूण २८ अब्ज डॉलर्स म्हणजे २.२३ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे.

यात दोन प्रकारच्या संपत्ती आहेत. पहिली या परिवारात सर्वात वरच्या पदावर म्हणजे द क्राऊन, मुकुटाच्या नावे असलेली संपत्ती आणि दुसरी संपत्ती म्हणजे त्या पदावर बसलेल्या राजा किंवा राणीची असलेली वैयक्तिक संपत्ती

याची फोड आणखी करायची झाली तर, लंडनमधील बकिंघम पॅलेस हा किल्ला राजपरिवाराच्या सर्वात मोठे पद असलेल्या द क्राऊनची संपत्ती आहे. तर स्कॉटलंडमध्ये बाल्मोरल कैसल ही एलिझाबेथ द्वितीय यांची खासगी मालमत्ता होती. आता ती त्यांच्या मुलाच्या नावे झालेली आहे.

ब्रिटनच्या राजा किंवा राणीच्या नावे 2.23 लाख कोटी संपत्तीत काय ?

  1. राजा किंवा राणीच्या पदावर बसलेल्या व्यक्ती संपत्ती- 1.55  लाख कोटी रुपये
  2. बकिँघम पॅलेस – 39 हजार कोटी रुपये
  3. डची ऑफ कॉर्नवालच्या नावे संपत्ती- 10 हजार कोटी रुपये
  4. केनसिंग्टन पॅलेस – 5हजार कोटी रुपये
  5. डची ऑफ लैंकास्टारच्या नावे संपत्ती – 5.96 हजार कोटी
  6. स्कॉटलंडमध्ये राजाच्या नावे असलेली संपत्ती – 4.71हजार कोटी

महाराणी मुकुट परिधान केलेल्या राजाच्या किंवा राणीच्या वैयक्तिक नावावर क्राऊनची म्हणजे राजघराण्याची संपत्ती नसते, तशीच ती सरकारच्याही मालकीची नसते. या संपत्तीवर क्राऊन स्टेट बोर्डाचे नियंत्रण आहे.

एलिझाबेथ यांची 4 हजार कोटींची वैयक्तिक संपत्ती

फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, राणी एलिझाबेथ यांच्याकडे 4 हजार कोटींची संपत्ती होती. त्यात त्यांची गुंतवणूक, कलात्मक वस्तू, मौल्यवान धातू, खडे, मालमत्ता यांचा समावेश होता. सैंडरिघम हाऊस आणि बाल्मारेल किल्ला ही पण महाराणींची वैयक्तिक संपत्ती होती.

कसा आहे बकिंघम पॅलेस

इंग्लडच्या महाराणीचे लग्झरी आय़ुष्य समजून घ्यायचे असेल तर बकिंघम पॅलेस हे त्याचे उदाहरण आहे. वयाच्या 70 वर्षापर्यंत महाराणी इथे राहिल्या. या पॅलेसमध्ये 775 खोल्या आहेत आणि 78 बाथरुम आहेत. राणीच्या मुकुटाची किंमत 4500 कोटी रुपये इतकी आहे. त्यासह मौल्यवान खड्यांची किंमत 31 हजार कोटी रुपये इतकी आहे. राणी एलिझाबेथ यांच्याकडे 200 हून अधिक हँडबॅग्स होत्या. त्यांना लँड रोवर कार पसंत होती, तिचे नाव त्यांनी डिफेंडर असे ठेवलेले होते.

संपत्तीतून झालेल्या कमाईतील केवळ 25 टक्के शाही परिवाराला

फोर्ब्सच्या अहवालानुसार 2020 साली राज परिवाराशी संबंधित असलेल्या संपत्तीतून 3.78  हजार कोटींचे उत्पन्न झाले होते. त्यातील 25 टक्के वाटा राजघराण्याला मिळाला तर 75 टक्के वाटा हा इंग्लंडच्या तिजोरीत जमा करण्यात आला होता.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.