ऑस्ट्रेलियासोबतच्या व्यापारी वादांमुळे चीनच्या समुद्रकिनाऱ्यावर भारतीय जहाजे अडकली

आता चीन सरकार हा कोळसा उतरवून देण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून हे जहाज आणि कर्मचारी चीनच्या समुद्रात अडकून पडले आहेत. |

ऑस्ट्रेलियासोबतच्या व्यापारी वादांमुळे चीनच्या समुद्रकिनाऱ्यावर भारतीय जहाजे अडकली
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 10:18 AM

वसई: चीनच्या कोफिडियन समुद्रकिनाऱ्यावर दोन भारतीय जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. या जहाजांवर 41 भारतीय खलाशी असून त्यांनी आता परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीची मागणी केली आहे. MV Anastasia आणि MV Jag Anand ही जहाजे ऑस्ट्रेलियन कोळसा घेऊन चीनमध्ये गेली होती. मात्र, आता चीन सरकार हा कोळसा उतरवून देण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे MV Jag Anand जहाज सप्टेंबर महिन्यापासून हे जहाज आणि कर्मचारी चीनच्या समुद्रात अडकून पडले आहेत. तर MV Anastasia हे जहाज गेल्यावर्षीपासून चीनच्या समुद्रकिनाऱ्यावर उभे आहे. (41 Indian sailors stuck on Chinese coast)

यापैकी एका जहाजावर वसईतील रक फर्नांडिस यक नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे. त्याच्या माहितीनुसार गेल्या 14 महिन्यांपासून कर्मचारी बोटीवरच आहेत. हे जहाज 20 सप्टेंबर 2020 ला चीनच्या कोफिडियन समुद्री किनाऱ्यावर 90 हजार टन कोळसा घेऊन पोहचले होते.

मात्र, ऑस्ट्रेलियाशी असलेल्या व्यापारी विवादांवरून चीन हा कोळसा समुद्रकिनाऱ्यावर उतरवून देण्यास परवानगी नाकारत आहे. तीन महिने जहाज अडकून पडल्याने या कर्मचारी हवालदिल झाले आहेत. या कर्मचाऱ्यांनी एक व्हीडिओ तयार करुन मदतीची याचना केली आहे. त्यामुळे आता मोदी सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार का, हे पाहावे लागेल.

इतर बातम्या:

‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ चीनच्या ताब्यात जाणार का?

भारताचे लष्कर प्रमुख सौदी अरब-यूएईत, पाकिस्तानमध्ये खळबळ

माझ्या वडिलांना फाशीपासून वाचव; 11 वर्षांच्या मुलाचे लुईस हॅमिल्टनला पत्र

(41 Indian sailors stuck on Chinese coast)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.