रशियामध्ये भीषण विमान अपघात, 6 जणांचा मृत्यू, जुन्या विमानाने हवेतच दम तोडला!

Russia Plane Crash : एंटोनोव्ह एएन-26 (Antonov An-26 transport plane) असं या विमानाचं नाव आहे, या अपघातात 6 लोकांचा मृत्यू झाला आहे.

रशियामध्ये भीषण विमान अपघात, 6 जणांचा मृत्यू, जुन्या विमानाने हवेतच दम तोडला!
विमान जुनं झालं असल्याने अपघात झाल्याची माहिती आता समोर येत आहे.

मॉस्को: रशियांमध्ये (Russia) एका प्रवासी विमानाचा अपघात झाल आहे. एंटोनोव्ह एएन-26 (Antonov An-26 transport plane) असं या विमानाचं नाव आहे, या अपघातात 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे विमान बुधवारी रडारवरुन गायब झालं होतं, रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यावश्यक सेवांच्या सुत्रांनी हे विमान अपघातग्रस्त झालं असून त्यातील 6 लोक मृत्यूमुखी पडल्याचं सांगितलं. विमान जुनं झालं असल्याने अपघात झाल्याची माहिती आता समोर येत आहे. हे विमान रशियाच्या पूर्व खाबरोवस्क भागातील एका नेचर रिचर्वमध्ये पडलं. ( 6 killed in plane crash in Russia The reason behind the accident is that the plane is old )

तास न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान त्या कंपनीचं होतं, जी कंपनी रशियाच्या एअरपोर्टवर (Russian airports) तांत्रिक बाबी तपासण्याचं काम करते. हे विमान तब्बल 42 वर्ष जुनं असल्याचं आता समोर आलं आहे. बुधवारी हे विमान रडारवरुन गायब झालं होतं. अत्यावश्यक सेवा मंत्रालयाने(Emergency services ministry) गुरुवारी या दुर्गम भागात या विमानाचे अवशेष सापडले. त्यानंतर बचाव दलाला दुर्घटनास्थळी पाठवण्यात आलं. मात्र, असं असलं तरी मंत्रालयाने चालक दलापैकी कुणही मृत्यूमुखी पडल्याची माहिती दिली नाही. मात्र, रशियन माध्यमांनी, चालक दलाच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे. माध्यम समुहाच्या माहितीनुसार, हे विमान जमिनीवर कोसळलं आणि त्यात आग लागली.

जुन्या विमानांमुळे अपघातांचं प्रमान वाढलं

रशियन वृत्तवाहिनी तास आणि इंटरफेक्सच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या पाहणीत हे कळालं की, या विमान दुर्घटनेत कुणीही वाचलं नाही. गेल्या काही वर्षात रशियामध्ये विमानन सुरक्षा मानकांमध्ये मोठे सुधार करण्यात आले आहेत. मात्र, दुर्गम भागात आजही मोठ्या प्रमाणात विमान दुर्घटना होत आहेत. यातील बहुतेक विमान दुर्घटना याच केवळ जुन्या झालेल्या विमानांमुळे होत आहेत, जी विमानं बऱ्याचदा रडारवरुन गायब होऊन जातात. याआधी जुलै महिन्यांत एंटोनोव्ह एएन-26 ट्विन इंजिन टर्बोप्रॉप या विमानात बसून 28 लोक जात होते. या विमानाचा अपघात झाला आणि कामचटका या पू्र्वेकडच्याच भागत हे सर्व लोक मृत्यूमुखी पडले होते.

खराब हवामान आणि मेंटेनंन्सअभावी अनेक अपघात

तास या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, याआधी एंतोनोव्ह एन-28 या विमानाने पेट्रोलोक्स-कामचत्स्कीवरुन उड्डाण घेतलं होतं. आणि ते पलानाला उतरणार होतं, मात्र, त्याआधीत डोंगराळ भागात या विमानाचा अपघात झाला. 2012 ची ही घटना आहे. या विमानात 14 प्रवासी होते त्यातील दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला होता. घटनेत दोन्ही पायलटही मृत्यूमुखी पडले होते, जेव्हा या दोघांचे रक्ताचे नमूने घेण्यात आले, तेव्हा त्यात दारुचे अंश सापडले होते. मात्र, असं असलं तरी गेल्या काही वर्षात रशियाने विमानन उद्योगात आपलं नाव ठळक केलं आहे. आधी रशियाला विमान दुर्घटनांचं घर म्हटलं जायचं, मात्र गेल्या काही काळात या दुर्घटना कमी झाल्या आहेत. असं असलं तरी अजूनही विमानांचा व्यवस्थि मेंटेनन्स न ठेवल्याने काही अपघात होतच आहेत. शिवाय, दु्र्गम भागात उड्डाण करतानाची काळजीही बऱ्याचदा घेतली जात नसल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा:

 

पाक-चीनला धडकी, अमेरिकेकडून भारत 30 प्रेडिएटर ड्रोन विकत घेणार, मोदींची ड्रोन निर्माता कंपनीच्या CEOसोबत बैठक

पाकिस्तानात आता पहिली हिंदू महिला अधिकारी, सना गुलवानी पहिल्याच प्रयत्नात सर्वात कठीण CSS परीक्षा पास

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI