AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाँगकाँगच्या बाजारात आता नव्या जीवाणूचा उद्रेक, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

सार्वजनिक रुग्णालयात रुग्णांमध्ये ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया संसर्गाची 79 प्रकरणे आढळून आल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांनी जनतेला सीफूड खाण्याचे टाळण्याचे आवाहन केलेय. सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनने गुरुवारी आणखी नऊ प्रकरणे नोंदवली आणि त्याची एकूण संख्या 88 झाली. वैद्यकीय तज्ज्ञांनी जनतेला सीफूड खाण्याचे टाळण्याचे आवाहन केले.

हाँगकाँगच्या बाजारात आता नव्या जीवाणूचा उद्रेक, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू
hongcong fishmarket
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 3:36 PM
Share

बीजिंगः कोरोनाच्या पाठोपाठ आता हाँगकाँगच्या मासळी बाजारात नव्या जिवाणूच्या उद्रेकानं चिंता वाढली आहे. संभाव्य धोकादायक विषाणूच्या संसर्गाच्या उद्रेकानंतर हाँगकाँगचा आरोग्य विभाग खडबडून जागा झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, गोड्या पाण्यातील माशांमधून या जिवाणूची उत्पत्ती झाल्याचं सांगितलं जात आहे. शहरातील संभाव्य धोकादायक जिवाणूच्या संसर्गाचा उद्रेक काही विक्रेत्यांनी विकलेल्या गोड्या पाण्यातील माशांशी संबंधित असल्यानं हाँगकाँगच्या मासळी बाजारात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांकडून जनतेला सीफूड खाण्याचे टाळण्याचे आवाहन

सार्वजनिक रुग्णालयात रुग्णांमध्ये ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया संसर्गाची 79 प्रकरणे आढळून आल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांनी जनतेला सीफूड खाण्याचे टाळण्याचे आवाहन केलेय. सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनने गुरुवारी आणखी नऊ प्रकरणे नोंदवली आणि त्याची एकूण संख्या 88 झाली. वैद्यकीय तज्ज्ञांनी जनतेला सीफूड खाण्याचे टाळण्याचे आवाहन केले. तसेच हातमोजे घातल्याशिवाय माशांना स्पर्श करू नका, असा इशारा दिल्यानंतर विक्रेते आणि दुकानदार खबरदारी घेत आहेत.

मासे हाताळताना विक्रेते आणि दुकानदारांना खबरदारी घेण्याचे आवाहन

हॉंगकॉंग चेंबर ऑफ सीफूड मर्चंट्सचे अध्यक्ष ली चोई-वाह म्हणाले की, त्यांना व्यवसाय धोक्यात येण्याची भीती आहे आणि मासे हाताळताना विक्रेते आणि दुकानदारांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. ही प्रकरणं grass carp, bighead carp आणि snakehead माशांशी संबंधित आहेत. ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस हा एक जीवाणू आहे, जो सामान्यतः आतड्यांसंबंधी मूत्र मार्गांमध्ये दिसतो. हा सहसा हानिकारक नसतो आणि कोणत्याही लक्षणांना कारणीभूत नसतो. परंतु रक्त, हाडे, फुफ्फुसे किंवा मेंदू आणि पाठीच्या कण्याला संरक्षित करणाऱ्या पडद्यामध्ये हा संक्रमित होऊ शकतो. विशेष म्हणजे काही रुग्ण इतर आजारांनी ग्रस्त आहेत, यावर अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

ते सहसा ताजे असल्याचं सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे शिजवले जात नाहीत

हाँगकाँगमध्ये मासे चांगल्या दर्जाचे आणि ताजे आहेत का हे तपासण्यासाठी सामान्यतः हाताने कच्चे मासे निवडतात. गोड्या पाण्यातील मासे मुख्यतः कोंजीसाठी वापरले जातात, परंतु ते सहसा ताजे असल्याचं सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे शिजवले जात नाहीत. सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनने म्हटले आहे की, 32 प्रकरणांमध्ये आढळलेला जीवाणू हा बाजारातून घेतलेल्या या गोड्या पाण्यातील माशांच्या नमुन्यांशी मिळताजुळता आहे. त्यामुळे आता हाँगकाँगच्या सरकारनं लोकांना सतर्क केलेय.

संबंधित बातम्या

सावधान, रशियात कोरोनाची पुन्हा लाट, दिवसभरात 1 हजार मृत्यू, नॉन वर्किंग विकची घोषणा

china covid cases 2021: चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार, विमान फेऱ्या रद्द, शाळा बंद, जागोजागी मास टेस्टिंग सुरु

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.