भारताला ज्याची भीती तेच घडले, टॅरिफचा जबर फटका, खळबळ उडवणारी आकडेवारी पुढे, 5.5 अब्ज डॉलर्सवर…
टॅरिफचे संकट भारतावर असून मोठा फटका भारताला बसल्याचे येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. या टॅरिफचा अनेक क्षेत्रांवर धक्कादायक असा परिणाम झालाय.

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत अमेरिकेचे संबंध तणावात आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. दोन्ही देशांमध्ये सध्या व्यापार चर्चा सुरू आहेत. मात्र, जोपर्यंत भारत रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करत नाही, तोपर्यंत अतिरिक्त टॅरिफ न काढण्याची भूमिका अमेरिकेने घेतली. आता धक्कादायक अशी आकडेवारी पुढे आली असून भारताच्या काही क्षेत्रांवर अमेरिकेच्या टॅरिफचा मोठा परिणाम पुढे आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होताना दिसतंय. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये मोठी घट झाल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसतंय. थिंक टँक GTRI ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे की, भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली.
भारताची अमेरिकेतील निर्यात 37.5 टक्क्यांनी घटली
सप्टेंबर दरम्यान भारताची अमेरिकेतील निर्यात 37.5 टक्क्यांनी घटली आहे, जी मे महिन्यातील 8.8 अब्ज डॉलर्सवरून सप्टेंबरमध्ये 5.5 अब्ज डॉलर्सवर आली आहे. GTRI ने रविवारी ही आकडेवारी जाहीर केल्याने एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. स्मार्टफोन, धातू, औषधे आणि ऑटो या वस्तूंची निर्यात घटली असून मोठा फटका बसल्याचे GTRI ने आपल्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे.
अमेरिकच्या टॅरिफचा मोठा फटका भारतातील या क्षेत्रांना
औषध उत्पादनांची निर्यात सप्टेंबरमध्ये 15.7 टक्क्यांनी घसरून 628.3 दशलक्ष डॉलर्सवर आली, जी मे महिन्यात 745.6 दशलक्ष डॉलर्स होती. अमेरिकेने आयात होणाऱ्या सर्व औषधांवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. यामुळे याचा फटका औषध कंपन्यांना मोठ्या प्रमाणात बसला. 100 टक्के टॅरिफ लावल्याने औषधांची निर्यात अमेरिकेत करणे कंपन्यांना परवडत नाहीये.
व्यापार करारांनंतर टॅरिफमुळे भारताला मिळणार दिलासा?
ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले की, भारत आणि पाकिस्तानकडे पाहिले तर आम्ही भारतासोबत व्यापार करार करणार आहोत आणि अंतिम टप्प्यात आमचे करार आहेत. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. आमचे संबंध खूप चांगले असल्याचे सांगताना देखील यादरम्यान ट्रम्प दिसले. भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा बंद झाली होती. अमेरिका व्यापार चर्चेसाठी आग्रही असल्याचे बघायला मिळतंय.
