AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Missile Attack On Israel : युद्धानंतर शांतता नाहीच, आता दुसऱ्याबाजूने इस्रायलवर पुन्हा एकदा मोठा मिसाइल हल्ला

Missile Attack On Israel : इस्रायलवर पुन्हा एकदा मोठा मिसाइल हल्ला झालेला आहे. इराण आणि इस्रायलमध्ये झालेल्या सीजफारला अजून आठवडाही झालेला नाही. इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टिम लगेच सक्रीय झाली. दक्षिण इस्रायलमध्ये सायरन वाजत आहेत.

Missile Attack On Israel : युद्धानंतर शांतता नाहीच, आता दुसऱ्याबाजूने इस्रायलवर पुन्हा एकदा मोठा मिसाइल हल्ला
Israel Attack Iran Image Credit source: File photo
| Updated on: Jun 28, 2025 | 11:27 AM
Share

इस्रायल-इराण युद्ध थांबून अजून आठवडाही झालेला नाही. अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशात सीजफायर झालं. इराणकडून होणारे हल्ले थांबले असले, तरी इस्रायलवर आता दुसऱ्याबाजूने हल्ले सुरु झालेत. इस्रायलच्या सभोवताली हमास, हिजबोल्लाह आणि हुथी या दहशतवादी संघटना आहेत. इराणनेच इस्रायल विरोधात लढण्यासाठी या दहशतवादी संघटना उभ्या केल्या आहेत. या दहशतवादी गटांना इराणकडूनच सर्व रसद मिळते. इराणच्या इशाऱ्यावरुन हे गट इस्रायलवर हल्ला करत असतात. आता येमेनमधून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती शनिवारी IDF ने दिली.

येमेनच्या बाजूने इस्रायलच्या दिशेने मिसाईल्स येऊ लागल्यानंतर दक्षिण इस्रायलमध्ये सायरन वाजायला सुरुवात झाली. येणारी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टिम लगेच कामाला लागली. या मिसाइल लॉन्चमुळे दक्षिण इस्रायलच्या अनेक शहरात सायरन वाजत होते. नागरिकांना संभाव्य धोक्याचा आगाऊ इशारा देण्यात आला. काहीही आठवड्यांपूर्वी येमेनमधील होदेदा बंदरावर इस्रायलने हल्ला केला होता. हुथी बंडखोरांनी अलीकडच्या काही महिन्यात सातत्याने इस्रायलवर मिसाइल हल्ले केले आहेत.

त्यांचा वापर ते इस्रायल विरोधात करतात

या हुथी बंडखोरांना इराणनेच बळ दिलय. त्यांचा वापर ते इस्रायल विरोधात करत असतात. मागच्या 12 दिवसांपासून इराण-इस्रायलमध्ये सुरु असलेलं भीषण युद्ध मंगळवारी थांबलं. आता दोन्ही देशांमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे. इशारे, वाद-प्रतिवाद सुरु आहेत. इस्रायलने 12 जूनच्या मध्यरात्री इराण विरोधात कारवाई सुरु केली. इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणचे अणवस्त्र तळ उद्धवस्त केले. इराणची सैन्य ठिकाणं आणि लष्करी अधिकाऱ्यांना इस्रायलने संपवलं.

किती लोक मारले गेले?

मागच्या रविवारी अमेरिकेने इराणच्या नतांज, एस्फान आणि फॉर्डो या तीन तळांवर GBU-57 हा हजारो किलो वजनाचा शक्तीशाली बॉम्ब टाकला. त्यानंतर इराणने कतरमधील अमेरिकेच्या अल-उदीद एअरबेसवर हल्ला करुन प्रत्युत्तर दिलं. इराणने डागलेली बहुतांश मिसाइल्स हवेतच नष्ट झाली. युद्धकाळात इराणमध्ये 600 पेक्षा जास्त लोक मारले गेले. इस्रायलच्या बाजूला जिवीतहानीचा आकडा खूप कमी आहे. पण इराणची मिसाईल्स रोखण्यात इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टिम कमी पडली. त्यामुळे इस्रायलच आर्थिक नुकसान जास्त झालं.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.