अमेरिकेला हिंदुत्वाच्या प्रचाराची भीती; अलबामाच्या शाळांमध्ये योगावरील बंदी कायम

अमेरिकेच्या अलबामा येथील खासगी शाळांमध्ये योगावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. (Alabama blocks bill lifting ban on yoga in schools after objections from conservatives)

अमेरिकेला हिंदुत्वाच्या प्रचाराची भीती; अलबामाच्या शाळांमध्ये योगावरील बंदी कायम
योगा
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 7:41 PM

अलबामा: अमेरिकेच्या अलबामा येथील खासगी शाळांमध्ये योगावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. गेल्या अनेक दशकांपासून येथील शाळांमध्ये योगावर बंदी आहे. अलबामा सिनेट ज्युडिशिअरी कमिटीमध्ये आज यावर सार्वजनिक सुनावणी करण्यात आली. यावेळी योगावरील बंदी हटवण्याच्या बिलाला मंजुरी मिळू शकली नाही. (Alabama blocks bill lifting ban on yoga in schools after objections from conservatives)

येथील दोन कंजर्वेटिव्ह गटांनी शाळांमध्ये भारतीय योग शिकवण्यास विरोध दर्शवला होता. योगामुळे ध्यानधारणेच्या पद्धतीचा किंवा हिंदुत्वाचा प्रचार होऊ शकतो, अशी भीती या गटांनी व्यक्त केली होती. हिंदुत्वामुळे धर्मांतरास सुरुवात होऊ शकते, असं या गटांचं म्हणणं होतं. तर, अलबामाच्या एका सीनेटने हे बिल व्यायामाशी संबंधित आहे. एखाद्या धर्माशी नाही, असं स्पष्ट केलं. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

योगाचं समर्थन

सिनेटमध्ये योगाला विरोध होत असतानाच काही जणांनी त्याला पाठिंबाही दिला. ओपेलिकाचे डेमोक्रेटिक प्रतिनिधी जेरेमी ग्रे यांनी योग केल्याने आपण हिंदू होऊ असं म्हटलं जातं. पण गेल्या दहा वर्षांपासून मी योग करत आहे आणि चर्चमध्ये जात आहे. मी अजूनही ख्रिश्चनच आहे, असं ग्रे म्हणाले.

बंदी केव्हापासून?

दरम्यान, या बिलाला पुरेसं समर्थन मिळालं नाही. त्यामुळे समितीच्या अध्यक्षाने हे बिल पुन्हा एकदा मांडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. अलबामा बोर्ड ऑफ एज्युकेशनने 1993मध्ये खासगी शाळांमध्ये योग, संमोहन आणि ध्यानधारणा करण्यास बंदी घातली होती. गेल्या वर्षी मार्चमध्ये ग्रे यांनी योग बिल मांडलं होतं. त्यावेळी या बिलाच्या विरोधात 84 आणि बिलाच्या बाजूने 17 मते मिळाली होती. त्यामुळे हे बिल मंजूर करण्यासाठी प्रतिनिधी सभेकडे पाठवण्यात आलं होतं. पण त्याला मंजुरी मिळू शकली नव्हती.

विरोधी मत काय?

अलबामा सिनेट ज्युडिशिअरी समितीने बुधवारी कंजर्वेटिव्ह प्रतिनिधींच्या विरोधानंतर हे बिल नामंजूर केलं. यावेळी अलबामाचे चीफ जस्टीस रॉय मूर यांच्या फाऊंडेशन फॉर मोरल लॉचे प्रतिनिधीही उपस्थित होते. हिंदू धर्मांचा अनुनय वाढू नये म्हणूनच हे विधेयक नामंजूर करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. योग हा हिंदू धर्माचा मोठा भाग आहे, असं रुढीवादी कार्यकर्ते बेकी गेरिट्सन यांनी सांगितलं. हे विधेयक मंजूर करणं म्हणजे शाळेत हिंदू धर्माचा प्रवेश करण्यासारखच आहे, असं गेरिट्सन यांनी म्हटलं आहे. (Alabama blocks bill lifting ban on yoga in schools after objections from conservatives)

संबंधित बातम्या:

तैवानमध्ये रेल्वे रुळावर ट्रक कोसळला, दुर्घटनेत 36 प्रवाशांचा मृत्यू

इम्रान खान यांची अवघ्या 24 तासांत पलटी, भारताकडून खरेदीचा ‘तो’ प्रस्ताव रद्द!

सुएझ कालवा ब्लॉकप्रकरणी भारतीय कर्मचारी अडचणीत, 25 जणांना अटक होणार?

(Alabama blocks bill lifting ban on yoga in schools after objections from conservatives)

Non Stop LIVE Update
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....